गंगापूर येथे २८ मे ला मोफत मराठा वधुवर मेळावा सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने आयोजन

गंगापूर प्रतिनिधी: सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने गंगापूर मध्ये मोफत मराठा वधुवर मेळाव्याचे २८ मे रोजी पांडुरंग लाॅन्स येथे आयोजन

सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व मराठा सोयरीकच्या संचालिका जयश्री कुटे,गंगापूर येथील पांडुरंग लॉन्सचे संचालक संजय पांडुरंग सोळके, गंगापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष आळंजकर , संचालक सतीश कबाडे सर , तुळशीदास पाठे,प्रकाश पठारे ,सहकारी बँकेचे चंद्रभान चव्हाण तसेच नानासाहेब दानवे यांनी दिली आहे.
हा मेळावा नेहमीप्रमाणे मोफत असून ८८ वा मेळावा संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मध्ये पांडुरंग लॉन्स, जामगाव रोड, येथे २८ मे दुपारी १२ वाजता होणार आहे. जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यास सहभागी व्हावे असे आवाहन समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले,ज्ञानेश्वर अंभोरे, प्रदीप शिंदे, वैजापूरचे मोतीभाऊ वाघ, जगदीश कुंटे, डॉ. गणेश नांद्रे, चंद्रकांत कासार, लवांडे, अंगत मोटे,उत्तम भोंडवे, पत्रकार विजय बनसोड ,विशाल जोशी ,अशोक लंघे,पूजा पवार यांनी केले आहे.
आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही. म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत ८६ यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत ३२०० लग्न पार पडलेले आहे. त्यापैकी ६०० लग्न हे विधवा, विदुर, घटस्फोटीत यांचे पार पाडलेले आहेत. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य अशी ही संस्था आहे.
या मेळाव्यासाठी वधू- वरांनी स्वतः २ फोटो बायोडाटा घेऊन पालकांसह यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी 7447785910 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!