गंगापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापतिपदीभाऊसाहेब पदार तर उपसभापतीपदी सचिन काकडे बिनविरोध

गंगापूर(प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब पदार तर उपसभापतीपदी सचिन काकडे यांची बिनविरोध
निवड करण्यात आली आहे.

गंगापुर येथील कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या निवडणुकीत
आमदार प्रशांत बंब व शिंदे गटातील
शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे
यांच्या पॅनलचे १३ संचालक निवडून
आले होते. २३ में रोजी दुपारी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात प्रशासक ज्ञानेश्वर मातेरे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती उपसभापती यांच्या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते सभापती पदासाठी भाऊसाहेब पदार व उपसभापती पदासाठी सचिन काकडे याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्याच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने सभापती व उपसभापती यांची बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मातेरे यांनी जाहीर केले.यावेळी नवनिर्वाचित सदस्य उमेश बाराहाते,दिपक बडे , सुशीलाबाई राजगीरे , सचिन काकडे, नवनाथ सुराशे, रामेश्वर गवळी, भाउसाहेब पदार , भारत पाटील, , अर्चना कृष्णा सुकासे ,सतीश डेडवाल, दत्तात्रय दुबिले उपस्थित होते सभापती भाऊसाहेब पदार व उपसभापतीपदी सचिन काकडे यांना आमदार प्रशांत बंब यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी किशोर धनायत लासुरस्टेशन कृऊबा सभापती शेषेराव जाधव, उपसभापती अनिल चव्हाण, संतोष जाधव, रामेश्वर मुंदडा,प्रदीप पाटील,, मारुती खैरे, दिपक साळवे, अशोक मंत्री, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, अरुण रोडगे,दिलीपसिंग राजपूत, उपसरपंच रवींद्र चव्हाण, रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवाहारे, प्रशांत मुळे, अतुल रासकर, कृष्णा सुकासे शिवप्रसाद अग्रवाल आदीसह भाजप शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!