गंगापूरातील घटना पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू चौघांवर गुन्हा दाखल तिन अटक…

गंगापूरातील घटना पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू चौघांवर गुन्हा दाखल तिन अटक
गंगापूर(प्रतिनिधी)पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पती ,सासू ,सासरे व अन्य एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल पती, सासू ,सासरे यांना अटक करण्यात आली.
गंगापूर शहरातील रमाईनगर भागातील एका विवाहितेने नवरा व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात मयत महिलेचे नातेवाईक प्रवीण सुदाम खरे वय २९ रा. वझर ता. गंगापूर यांनी गंगापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की अश्वीनी बाबासाहेब वाघमारे २८ ही विवाहिता मागील चार ते पाच वर्षांपासून गंगापूर शहरातील रमाईनगर भागात रहात होती.
या काळात तिने पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला म्हणून मयत अश्विनीला शारिरीक व मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी तिने २९ जुलै रोजी विषारी औषध घेउन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते तिचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान ८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी खरे यांच्या फिर्यादीवरून पती बाबासाहेब रतन वाघमारे, रतन वाघमारे, मालनबाई रतन वाघमारे,व अन्य महीलेच्या विरोधात भादवी कलम गुन्हा गंगापूर पोलिसात ८ ऑगस्ट रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दिपक औटे पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!