कार आडवी लावून ट्रकचालकाला लुटले.गंगापुर वैजापुर रोडवरील घटना


गंगापुर (प्रतिनिधी)
गंगापूर वैजापूर रोडवर ट्रकच्या समोर कार आडवी लावून ट्रकड्रायव्हरला मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना घडली असुन चालकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे 

याविषयी अधिक माहिती अशी की शिंगी फाट्याच्या पुढे आशीर्वाद पेट्रोल पंपाजवळ 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास  कार मधून येवून ट्रकला कार आडवी लावून  ट्रक ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले तसेच चोरी करताना गोंधळ व आवाज ऐकून बाजूच्या रस्त्यालगत असलेल्या शेतवस्ती वरील शेतमालक उठून बाहेर आले व ते आल्यावर चोरट्यांनी पळ काढला मात्र पुढ काही अंतर पुढे जाऊन परत ट्रक जवळ येवुन चालक व शेत मालक यांना धमकावून गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करत होते परंतु शेत मालक आसाराम गायकवाड यांनी समोरील हॉटेल चालक दादा जाधव यांना आवाज दिला त्यामुळे चोरटे कारमधून पळाले तसेच ट्रक ड्रायव्हर चोरटे परत येऊन मारहाण करतील या भीतीने ट्रक ड्रायव्हर घाबरून ट्रक सह निघून गेला. त्यानंतर गायकवाड यांनी त्यांच्या संभाजीनगर येथे राहत असलेल्या मुलाला याबाबत माहिती दिल्याने त्यांचा मुलगा बाळासाहेब गायकवाड याने तेथे येऊन समोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळले .

नुकताच वैजापुर गंगापुर रस्ता रुंदीकरण करण्यात येऊन गुळगुळीत झाल्याने या रसयावरील रहदारी वाढली होती. चारचाकी व अवजड वाहनांसोबतच अनेक ट्रॅव्हल्स व बसेस नाशिक व मुंबईकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करू लागल्या आहेत

मात्र गेल्या काही दिवसांपासून गंगापुर वैजापुर रोडवरील वाहनचालकांना लुटण्याचे प्रमाण वाढले असून  अशा घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने चोरट्याची हिंमत वाढली असून चांगला रस्ता असूनही वाहनधारक रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करण्याचे टाळू लागल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!