काटेपिंपळगाव येथील तलाठी व माजी पंचायत समिती सदस्य १० हजार रुपये घेतांना लाचेच्या जाळ्यात.


गंगापूर (प्रतिनिधी) वारसा हक्काने सातबारावर नोंदीसाठी १० हजाराची लाच घेताना पंचायत समिती सदस्य व तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले .
अठ्ठावीस वर्षीय तक्रारदार यांचे वडील व चुलत भाऊ यांची सात बारावर वारसा हक्काने नोंद घेऊन सात बारा देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी प्रविण दिलवाले यांनी पंचा समक्ष १० हजार रुपये लाचेची मागणी करून १० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लागलीच १९ जुन रोजी पंचासमक्ष १० हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे सोबत असलेले खाजगी इसम माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ चव्हाण यांचेकडे देण्यास सांगितले असता, खासगी इसम चव्हाण यांनी लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने आलोसे तलाठी प्रवीण अशोक दिलवाले, वय ४७ वर्षे, व्यवसाय नोकरी, तलाठी, सजा काटे पिंपळगाव, ता गंगापूर, जि छत्रपती संभाजी नगर वर्ग ३, रा. वैजापूर, जि छत्रपती संभाजी नगर.व खासगी इसम माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण, वय ३८ वर्षे, व्यवसाय शेती, राहणार काटेपिंपळगाव, ता गंगापूर, जि छत्रपती संभाजी नगर, यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,  अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव ,पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष धस,पो अं, युवराज हिवाळे, केवलसिंग घुसिंगे, चालक पो अंमलदार बागुल, लाप्रवि. छत्रपती संभाजी नगर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!