आईवडीलांकडे आजच्या मुलांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलनण्याची गरज स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती काका माऊली

आईवडीलांकडे आजच्या मुलांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलनण्याची गरज- स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती काका माऊली


अहमदनगर (प्रतिनिधी)शिवतंत्र परिवारातर्फे आयोजीत साधना कार्यक्रम संपन्न
शिवतंत्र परिवार राहुरी येथे आयोजीत लक्ष १८० दिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन शिवतंत्र परिवाराच संस्थापक अध्यक्ष डॉ विश्व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालपाणी उद्योग समूहाचे संजय मालपाणी होते तर प्रमुख अतिथी म्हणून मोशी (पुणे) येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्री संतोष कुलकर्णी (काका माऊली) होते या कार्यक्रमात सहभागी शिबीर साधकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले

शिवतंत्र परिवारातर्फे आयोजिम साधना कार्यक्रमात आलेले अनुभव प्रशिक्षणार्थी साधकांनी कथन केले व्यसनमुक्ती जीवनातील प्रमुख सात तत्व अंगिकृत केल्याने जीवनात जे अमुलाग्र बदल येतात. त्यांची संपूर्ण माहिती संस्थापक अध्यक्ष तनपुरे महाराज यांनी दिली हे सेवाशिबीराच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये हिंदूसंस्कृती व त्यातील सकारात्मक निर्माण होणारे बदल रुजवण्याचा संकल्प त्यांनी केला या कार्यक्रमाचे आयोजन मनिषाताई तनपुरे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मालपाणी यांनी भगवत गीता व छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य यातील साम्य अतिशय सुंदर भाषेत समजून सांगीतले दोन वर्षात त्यांनी भगवतगीता पाठांतर केल्यानंतर ऑनलाइन माध्यमातून आज ८ लाखापेक्षा जास्त साधक जगभरात त्याचे पांठातर करीत आहेत. ते केवळ संजय मालपाणी यांचा आदर्श घेऊन काका माऊली यांनी आपल्या आशिर्वादरुपी भाषणातून सात सुरांचे जीवनातील महत्व – व आपले कर्माचे समर्पण, आईवडीलांकडे आजच्या मुलांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलनण्याची गरज-याविषयी मार्गदर्शन केले. व संस्थापक अध्यक्षांच्या कार्यास भरभरुन आशिर्वाद दिले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!