अविस्मरणीय क्षण गंगापूर तालुक्यातील महिलेला तब्बल दहा वर्षांनंतर मिळाले चोरी गेलेले दागिने आनंदाश्रूने पोलिस अधीक्षकांचे मानले आभार

गंगापूर तालुक्यातील महिलेला तब्बल दहा वर्षांनंतर मिळाले चोरी गेलेले दागिने आनंदाश्रूने पोलिस अधीक्षकांचे मानले आभार…


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)दहा वर्षापुर्वी चोरी गेले स्त्रीधन परत मिळाले.. पतीच्या निधनानंतर त्यांचा कमाईचा अमुल्य ठेवा परत मिळाल्याने पोलीस अधीक्षकांचे आभार मानतांना महिलेच्या डोळयात तरळले आनंदाश्रु … चोरी गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहनासह, हरविलेले २७ मोबाईल असा एकुण २१ लाख,५९ हजार, ६८६ रूपयांचा मुद्देमाल पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी नागरिकांच्या स्वाधीन केला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात अंतर्गत नागरिकांचे चोरी झालेला दागिने, वाहन, तसेच हरविलेले/गहाळ झालेले मोबाईल फोन असा एकुण २१ लाख  ५९ हजार ६६८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जिल्हा पोलासांना यश मिळाले आहे. हा हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यातील फिर्यादीना तातडीने मिळावा याकरिता पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, व अप्पर पोलीस अधीक्षक  सुनिल लांजेवार,  यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याचे सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. याच अनुषंगाने पोलीस ठाणे गंगापुर येथे २०१३ मध्ये गणेशवाडी येथील शेतवस्तीवरिल संतोष जाधव यांचे घरी घरफोडी होवुन सोन्याचे गंठण व अंगठी असा मुद्देमाल चोरी गेला होता. पोलीसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणुन यातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता परंतु यातील फिर्यादी हा त्यावेळी मयत झाल्याने व फिर्यादीची पत्नी रत्नमाला संतोष जाधव हिने त्यांचे राहते घर बदल्यामुळे तिला पोलीसांनी त्यांचा चोरी गेलेले दागिने मिळविल्या बाबत माहिती नव्हती.  गंगापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी स्वत: यातील मयत फिर्यादीची पत्नी रत्नमाला हिचा शोध घेवुन तिचा पत्ता शोधुन काढुन त्या महिलेला त्यांचा २०१३ मध्ये चोरी झालेले त्यांचे सोन्याचे गंठन व अंगठी ही हस्तगत केल्याचे सांगितले तेव्हा तिचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही ती आश्चर्यचकित होवुन खरंच मिळाले का सर.. असे उदगार काढले पतीचे निधन झाल्यानंतर  आर्थिक परिस्थीती अत्यंत बिकट झाल्याने नातेवाईकांचे घरी राहत असल्याचे सांगुन ती रडायला लागली होती. यावर पो.नि. सत्यजीत ताईतवाले यांनी तिला कोर्टाची संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया समजावुन सांगितले व कोर्टाची कायदेशिर पक्रिया पुर्ण करून ९ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक मनिष कलावानिया यांचे हस्ते जाधव यांचे विस ग्रॅम सोन्याचे गंठन व दोन ग्रॅमची अंगठी असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे दागिने देण्यात आल्यानंतर जाधव या अत्यंत भावुक होवुन त्यांनी पोलीस अधीक्षकांचे आभार मानले यावेळी पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोहेका शकील शेख, राष्ट्रवादीच्या नेत्यां कावेरीताई पाहुणे यांची प्रमुख उपस्थिती होती दहा वर्षानंतर तिला परत मिळालेले दागिने ती बराच वेळ न्याहळत होती. तिला तिचे दागिन परत मिळाले यावर विश्वास बसत नव्हता. नव-याच्या अत्यंत कष्टाच्या कमाईतुन घेतलेले दागिने हे पतीच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणुन तिला परत मिळाल्याने ती अत्यंत निशब्द व निरागस भावनेने सर्वांचे आभार व्यक्त करत होती.*

तसेच पोलीस ठाणे विरगाव अंतर्गत लाडगाव येथील एच.पी. पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांची चार लाख रूपयांची बँग हिसकावुन तिन आरोपी पळुन गेले होते यातील आरोपीतांना अटक करून त्यांचे कडुन २ लाख ९२ हजार रुपये हस्तगत करण्यात आले होते. हे पैसे पंपाचे मालक अब्दुल राफे यांना देण्यात आले. पोलीस ठाणे देवगाव रंगारी येथील चोरीचे तीन गुन्हे ज्यात राजेंद्र मारूती सोनवणे रा. ताडपिंपळगाव यांचा ५२ ग्रॅम सोनेच्या दागिने चोरी गेले होते ते पोलीसांनी हस्तगत करून त्यांना परत करण्यात आले आहे ज्याची किंमत ३ लाख २१ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल त्यांना यावेळी परत करण्यात आला, मनोज प्रभाकर चपके रा. देवगाव रं. यांचे १ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांना परत करण्यात आले आहे. तर बाळु सर्जेराव सोनवणे रा देवळाणा यांची चोरी झालेली टाटा सुमो किंमत सात लाख रूपये हस्तगत करून त्यांना परत करण्यात आली आहे. असा एकुण ११ लाख ९९ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल देवगाव रंगारी पोलीसांनी हस्तगत करून परत केला आहे. त्याचप्रमाणे पिशोर पोलीसांनी सुरमाळ गड येथील पुजारी रुख्मनबाई सखाराम नागोडे यांचे चोरी झालेल्या रोखरकमेपैकी ५ हजार ३२६ रूपये हस्तगत करून त्यांना रोख स्वरूपात परत करण्यात आले आहे.
२६ मोबाईल हॅण्डसेट मुळ *मालकांना परत*

यामध्ये पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरविलेल्या मोबाईल चिकलठाणा (१६ मोबाईल) पैठण (११ मोबाईल) नागरिकांचे हरविलेल्या मोबाईल फोनचा सातत्याने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेऊन असे एकुण २६ मोबाईल हॅण्डसेट ज्याची अंदाजे किंमत ५ लाख १३ हजार रुपये नागरिकांना परत करण्यात आले आहे. यात झाल्टा फाटा येथील सतिष नितीन शिंदे यांचा आय फोन हा परत मिळाला तसेच मुंजाभाऊ नारायण सोळंके रा. शेद्रा या कामगाराने एप्रिल-२३ मध्ये हप्त्यावर घेतलेला त्याचा हरवलेला मोबाईल आज परत मिळाल्याने अत्यंत आंनदात होते. तर मनपा येथील कार्यरत सुरज सोमनाथ गायकवाड यांचा मे-२३ मध्ये घेतलेला वनप्लस ११ आर हा पैठण बसस्टॅन्ड येथे हरवलेला मोबाईल परत मिळाल्यानेे पोलीसा वरिल त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी परत मिळवून दिल्याने नागरिकांनी पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!