अज्ञात ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून ठोकल्याने भेडांळयाचा आरोग्यसेवक जागेवर ठार


गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारातील ग्रेनाॅज कंपनी समोर अज्ञात ट्रकने मोटारसायकलवरील भेंडांळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन आरोग्यसेवकाला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक चंद्रकांत कडुबा जंगले (४५) मुळ राहणार फुलंब्री व
प्रसाद प्रमोद कुलकर्णी (३५) हे दोघे मोटारसायकल क्रमांक एम एच २० डी के ८३९३ वर बसून गंगापूर येथुन ६ जुन रोजी रात्री साडे आठ वाजता भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारातील ग्रेनाॅज कंपनी समोर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवले असता चंद्रकांत जंगले याचा जगीच मृत्यू झाला तर प्रसाद कुलकर्णी हा गंभीर जखमी झाला.जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता जंगले याला मृत घोषित केले तर प्रसाद कुलकर्णी यांच्या वर डॉ पवन मुंदडा यांनी प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत पाठवले या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!