बियाणे पेरणी पूर्ण झाल्यावर कारवाईचा बडगा कशासाठी? कापूस बियाण्यांची बेभाव विक्री:जिल्ह्यात २० बि बियाण्याचा दुकानांवर परवाना निलंबनाची कारवाई तर ९ दुकानांना ताकीद व नोटीस बजावली.गंगापरच्या दुकानाचा समावेश.


गंगापूर (प्रतिनिधी) कृषी विभागाचे वरातीमागून घोडे.बियाणे पेरणी पूर्ण झाल्यावर कारवाईचा बडगा.
दुकानदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार .
कपाशी बियाणे उपलब्ध असूनसुद्धा कृत्रिम तुटवडा दाखवून बेभाव बियाणे विकल्या प्रकरणी गंगापूर शहरांसह ग्रामीण भागातील ७ कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तालुका कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा दुकानाचे कापूस व ईतर बियाण्याचा परवाना ९ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून २० दुकानाचे कापूस बियाणांचा परवाना निलंबित करण्यात आला.तर पाच दुकानदारांना ताकीद देण्यात आली व ३ दुकानांना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली.
कृषी विक्रेत्यातर्फे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केल्या जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या व अश्या कृषी केंद्र चालकांवर ठोस कारवाई करण्याची मागणीही केली होती. दरम्यान भरारी पथकाने फिरून त्यांच्यावर कारवाई केली. पाहणी दरम्यान कृषीकेंद्र चालक कृषी विभागाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने दिसून आले. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करीत गंगापूर शहरातील तीन व लासुरस्टेशन तीन तर ग्रामीण भागातील एक असे एकुण सात कृषी केन्द्राचे कपाशी बियाणे विक्रीची परवाने निलंबित केले आहे.
या धडक कारवाईदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कांचन ॲग्रो एजन्सी, मोढा रोड, सिल्लोड,माऊली कृषी सेवा केंद्र, शिवना, सिल्लोड,बळीराजा अग्रो एजन्सी, शिवना, सिल्लोड,
श्रद्धा कृषी सेवा केंद्र, शिवना, सिल्लोड,साई कृषी सेवा केंद्र, भराडी, सिल्लोड,श्री पंचावतार कृषी सेवा केंद्र, पोरगाव, पैठण,गुरुमाऊली कृषी सेवा केंद्र पाचोड, पैठण ,कषीमित्र अग्रो एजन्सी, गंगापूर या दहा कृषी सेवा दुकानाचे ३१/०३/२०२५ पर्यंत कापुस बियाणे व ईतर बियाण्याचा परवाना निलंबित करण्यात आला असून साक्षी कृषी सेवा केंद्र कायगाव, गंगापूर, अरिहंत शेतकरी सेवा गंगापूर, गणपती कृषी सेवा केंद्र पाचोड, पैठण, भागवत कृषी सेवा केंद्र पाचोड, पैठण,भाग्यलक्ष्मी शेती साहित्य, पिशोर, कन्नड, वैभव मशिनरी स्टोअर्स, गंगापूर, युवराज कृषी सेवा केंद्र, लासूर स्टे., गंगापूर, अंबिका कृषी सेवा केंद्र, लासूर स्टे. गंगापूर ,सिद्धार्थ मशिनरी लासूर स्टे. गंगापूर, गणेश कृषी सेवा केंद्र तिडका, सोयगाव,या दहा दुकानाचे कापूस बियाणे विक्री परवाना ३१/०३/२०२५ पर्यंत निलंबित करण्यात आला आहे. तर गौरीकृपा कृषी उ‌द्योग, करमाड,पंचकृष्ण कृषी सेवा केंद्र करमाड,शेलार अग्रो अँड मशिनरी लासूर, गंगापूर, जय अंबिका कृषी सेवा केंद्र, अंबेलोहळ, सद्‌गुरुकृपा कृषी सेवा केंद्र, शेंदूरवादा, गंगापूर ,संदीप कृषी सेवा केंद्र लासूर स्टे., गंगापूर, यां दुकानदारांना ताकीद देवुन सोडण्यात आले तर पवन एजन्सी, सिल्लोड,
मराठवाडा कृषी सेवा केंद्र भराडी
साईनाथ कृषी सेवा केंद्र सिल्लोड यांना सूचना देवूनही सुनावणीस गैरहजर राहिल्याने दुबार नोटीस बजावली आहे.

बियाणे, खते विक्री करताना किंवा साठवणूक करताना विक्रेत्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. बियाणे, खतांची कोणत्याही प्रकारचे अवैध विक्री, साठवणूक किंवा फसवणूक आढळल्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

गंगापूरातील ७ कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित तर तीनला ताकीद.

साक्षी कृषी सेवा केंद्र कायगाव, अरिहंत शेतकरी सेवा गंगापूर,वैभव मशिनरी स्टोअर्स, गंगापूर, युवराज कृषी सेवा केंद्र, लासूर स्टे., अंबिका कृषी सेवा केंद्र, लासूर स्टेशन,सिद्धार्थ मशिनरी लासूर स्टेशन. शेलार अग्रो अँड मशिनरी लासूर, जय अंबिका कृषी सेवा केंद्र, अंबेलोहळ, सद्‌गुरुकृपा कृषी सेवा केंद्र, शेंदूरवादा, संदीप कृषी सेवा केंद्र लासूर स्टेशन.,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!