मुलीचे लग्न जमविल्याने प्रियकर तरूणाचा तिच्या आईवर चाकूहल्ला

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी:
मै भी नही जिउंगा तुम्हे भी नही जिने दुंगा असे म्हणत स्वताच्या हातावर चाकुने वार करून मुलीच्या आईवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांनी आरोपीला केली अटक.
शेजारी राहणाऱ्या २० वर्षीय मुलीबरोबर प्रेमाचे सुत जुळले परंतु अंतरधर्मीय असल्याने आईने मुलीचे लग्न नातेवाईकातील एका मुलासोबत जुळविला. हा प्रकार त्या तरूणाला समजताच तरूणाने मुलीच्या आईचा पाठलाग करत मै भी नही जिउंगा तुम्हे भी नही जिने दुंगा असे म्हणत स्वताच्या हातावर चाकुने वार केले व नंतर मुलीच्या आईच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगवधान राखत महिलेने हाताने चाकु अडविल्याने हातावर चाकुचा वार होवून महिला जखमी झाली. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महेशनगर भागात हा प्रकार घडला. इम्तियाज शेख असे या आरोपीचे नाव आहे.

४५ वर्षीय महिला ही महेशनगर भागातील खाजगी रूग्णालयात स्वच्छतेचे काम करते. आरोपी हा तिथे आला तुम्ही मला का बोलत नाही तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न का जुळविले असे म्हणाला. त्यावर महिलेने माझी मुलगी तुझ्यावर प्रेम करत नाही तु तीच्या नादाला लागु नकोस असे सांगताच आरोपी इम्तीयाज सय्यद याने खिशातील चाकु काढत स्वताच्या हातावर मारून घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या गळ्यावर चाकुने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने हा वार अडविल्याने तीच्या हातावर चाकुचा वार लागुन महिला जखमी झाली. हा प्रकार स्थानिक नागरीक व रिक्षाचालकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तरूणाला धरले. परंतु इम्तियाज याने त्यांच्या हाताला झडका मारत पळ काढला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी इम्तियाज विरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण संवेदशन शिल असल्याने पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी पथकाला पाठवून आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!