१५ हजार रुपयांची लाच घेऊन खाजगी व्यक्तीसह पोलिसाने मोटारसायकलवरुन धुम ठोकली गंगापूर शहरात लाचलुचपत विभागाचे अधिकारी व पोलीसात रंगला पाठशिवणीचा खेळ.तिघे फरार..


गंगापूर प्रतिनिधी: लाचेची रक्कम घेऊन आरोपी पोलीस व खासगी व्यक्ती धुमस्टाईलने मोटारसायकलवरुन फरार! झाल्याची घटना गंगापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर २८ मे रोजी रात्री साडे सात वाजेदरम्यान घडली असून तिन्ही आरोपी फरार झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागामध्ये तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची हायवा गाडी गंगापूर हद्दीत मधुन चालू देण्यासाठी तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलीस अंमलदार सुनील राठोड व पोलीस हवालदार लक्ष्मीकांत सपकाळ यांनी पंचा समक्ष १५ हजार रुपये लाचेची मागणी करून राठोड यांनी १५ हजार रुपये खाजगी इसमाच्या मार्फतीने स्वीकारून स्वीकारलेल्या पंधरा हजार रुपयांच्या लाचेसह खाजगी व्यक्ती व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदार सुनील राठोड हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात मोटारसायकलवरुन जात असताना कार्यालयासमोर मोटारसायकल उभी करताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यांचा संशय आल्याने खाजगी व्यक्ती व सुनील राठोड यांनी पंधरा हजार रुपये लाच घेऊन मोटारसायकलवर धुम ठोकली.तर उपविभागीय कार्यालयात उपस्थित असलेल्या दुसरा पोलीस हवालदार लक्ष्मीकांत सपकाळ हा घटनेची माहिती मिळताच फरार झाला  खाजगी व्यक्तीसह दोन आरोपीवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत विभागाच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाल्याची चर्चा गंगापूर शहरात वा-यासारखी पसरल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे.लाचलुचपत विभाग फरार आरोपींवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव ,पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संतोष घोडके,पोलीस हवालदार भीमराज जिवडे, युवराज हिवाळे, केवलसिंग गुसिंगे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!