श्री मुक्तानंद महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांसह व्याख्यान संपन्न

श्री मुक्तानंद महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांसह व्याख्यान संपन्न

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील श्री मुक्तानंद महाविद्यालय येथे आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य लक्ष्मणराव मनाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी “बेटी बचाव, बेटी पढाव” या विषयावरील पथनाट्याचे सादरीकरण केले.


प्राचार्या प्रा. डॉ. सी. एस. पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या विविध कार्यक्रमांचे आणि व्याख्यानांचे प्रास्ताविक करताना म्हटले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी महाविद्यालयातून अध्ययन आणि अध्यापन यासोबतच विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांसाठी महत्वाची आहे मराठवाडा या पावन भूमीच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये आपले योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम याबाबत जनजागृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाते असे नमूद केले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाप्रीत्यर्थ आयोजित विशेष व्याख्यानासाठी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सदस्य के. ई. हरिदास यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य लढा आणि समकालीन मराठवाड्याची सध्यस्थिती या विषयावर आपले विचार व्यक्त करतांना एकंदरीत मराठवाडा या विभागाच्या सद्य स्थितीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, जो मराठवाडा निजामशाही आणि त्यांच्या गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या स्वातंत्र्यसेनानीचे कार्य, बलिदान आणि त्यांचा त्याग याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. तसेच खऱ्या अर्थाने मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या पंचाहत्तर वर्षामधील मराठवाड्याची एकंदरीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचे विवेचन उपस्थितांसमोर केले. मराठवाड्यातील समस्या, सर्वसामान्यांचे, कष्टकरी यांचे दयनीय जीवन, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा, रस्त्यांच्या दुरावस्था, शिक्षणाचा अभाव, धार्मिक अंधश्रद्धा अजूनही मराठवाड्याचा विकासासाठी मारक ठरत असल्याचे मत सरांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना लक्ष्मणराव मनाळ यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्यासोबत केलेले कार्य याचे विवेचन करतांना त्यांच्या आठवणींना उजाळा देत मराठवाड्याच्या विकासासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संतोष अंबिलवादे, रावसाहेब तोगे, मनीष वर्मा, शामसुंदर धूत, बाबासाहेब लगड, राहुल वानखेडे, लायन्स क्लबचे योगेश धोत्रे, जितेंद्र महाजन, अशोक गुरनाळे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.वैशाली बागुल , उपप्राचार्य डॉ.बी. टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, शालेय समितीचे सोनवणे सर, मुख्याध्यापक, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, न्यू हायस्कूलचे सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!