सेवानिवृत्त वरीष्ठ लिपिक लक्ष्मण ताकपिर यांना शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

गंगापूर (प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील पान रांजणगाव खुरी येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक लक्ष्मण ताकपिर यांच्या सेवानिवृत्तझाल्यामुळे शाळा व ग्रामस्थांनी सपत्नीक सत्कार केला.


छत्रपती संभाजी विद्यालयामध्ये २१ जुन रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कल्याण इंदापूरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक त्रिंबक ढगे यांची उपस्थिती होती
शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावकऱ्यांमध्ये नाना या टोपण नावाने परिचित असलेले लक्ष्मण ताकपिर यांनी ३९ वर्ष शाळेमध्ये सेवा दिली .
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने ताकपीर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राठोड , ढगे , बप्पासाहेब लघाने , पांडुरंग पायगन, अशोक काचोळे यांनी नानांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.रांजणगाव खुरीचे सरपंच सुरेश भिसे,उपसरपंच आप्पासाहेब लघाने,
गावचे माजी सैनिक दत्तात्रय बखळे, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय आम्ले
माझी पोलीस उपनिरीक्षक तोगे , दौलताबाद पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल विठ्ठल खंडागळे , अरुण वाकडे,अंबादास तागड , तोगे महाराज, युनुस शेख आदिंसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद वल्ले यांनी तर आभार श्रीराम ढगे यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!