लग्नघरात घडलंय भयंकर काही! नवरदेव- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; ह्रदयद्रावक घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ

लग्नाच्या घडलंय भयंकर काही! नवरदेव- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; ह्रदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ

मैनपुर (प्रतिनिधी) उत्तरप्रदेशमधून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मैनपूरमध्ये एका तरुणाने आपल्या आपल्या नवविवाहीत भावासह त्याच्या पत्नीची आणि भावोजी, मित्र आणि धाकटा भाऊ अशा एकूण 5 नातेवाईकांची हत्या केली आहे.

या हत्येनंतर त्याने स्वतःच्याही डोक्यात गोळी झाडून घेतली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, शिववीर यादव नावाच्या तरुणाने पाच जणांची हत्या करुन स्वतःही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. किशनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोकुलपूर आरसारा गावामध्ये ही भयंकर घटना घडली. शिववीरच्या धाकट्या भावाचं लग्न शुक्रवारी झाले होते.

28 वर्षीय शिववीरने त्याचा भाऊ भुल्लन यादव (25), कालच लग्न झालेला भाऊ सोनू यादव (21), सोनूची पत्नी सोनी (20 वर्ष), भावोजी सौरभ (22 वर्ष) आणि मित्र दीपकवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी हे सर्वजण झोपेत असताना शिववीरने कुऱ्हाडीने हल्ला करुन या सर्वांची हत्या केली. त्याने पत्नी डॉली (24) आणि मामी सुषमा यांच्यावरही हल्ला करुन त्यांना जखमी केले. त्यानंतर शिववीरने गावठी पिस्तुलने स्वत:वर गोळी झाडली

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!