भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूर येथे अभिवादन

भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूर येथे अभिवादन

गंगापूर (प्रतिनिधी) चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धचार्य भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांचा स्मृतिदिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गंगापूर येथे रिपब्लिकन सेना वतीने अभिवादन करण्यात आले रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव , बाबासाहेब भिवसाने, यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले यावेळी पत्रकार सुभान शहा गंगापूर तालुका अध्यक्ष आनंद भिवसाने गंगापूर शहराध्यक्ष अबू चाऊस, माजी नगरसेवक राजू अनंतराव खाजेकर, भागिनाथ कीर्तीशही, संदीप खाजेकर , एडवोकेट सुनील गायकवाड , राहुल सोनवणे, व जेष्ठ नागरिक शेकुजी खाजेकर, अंकुशराव कांबळे बाबा, नामदेव भिवसाने यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अनिस पठाण संजय पवार नवाज खान सादिक बासुलान अबरार शेख इक्बाल बोहुरी आधी बहुजन बांधव रिपब्लिकन सेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!