बातमीचा दणका.गंगापूर येथे चढ्या भावाने कपाशीची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले.तर काही दुकानांची तपासणी केली असता अनेक दुकानांमध्ये त्रुटी आढळल्यान तपासणी करून अहवाल पाठविण्यात आला आहे

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील कृषि मित्र ऍग्रो एजन्सी मध्ये चढ्या दराने कापुन बियाणे विक्री करताना कृषी विभागाच्या पथकाने १० जुन रोजी रंगेहाथ पकडले तर काही दुकानांची तपासणी केली असता अनेक दुकानांमध्ये त्रुटी आढळल्याने तपासणी करून अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे

तालुक्यात चढ्या भावाने बियाणे विक्री होत असल्याची बातमी प्रसिद्ध होताच कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून एकास पकडून परवाणा निलंबित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.कृषी विभागाने गंगापूर येथील
कृषी मित्र ऍग्रो एजन्सी, वैजापूर रोड, गंगापूर या ठिकाणी चढ्या भावाने कपाशीची विक्री होत असल्याचे कृषि विभागास खबऱ्या मार्फत माहिती मिळाली, त्यानंतर कृषी विभागाने डमी ग्राहक पाठवून सदरील कृषि मित्रऍग्रो एजन्सी, वैजापूर रोड, गंगापूर या विक्रेत्यास ज्यादा दराने कपाशीचे बियाणे विकताना पकडण्यात आले.कृषी सेवा केंद्राकडून राशी कंपनीच्या आर सी एच ६५९ या वाणाची मागणी केली, तेव्हा कृषी सेवा केंद्र चालकाने सदरील वाणाचे पाकीट १०५० रुपये ला ग्राहकास विकले ज्याची मूळ किंमत ८६४ रुपये असताना बिल मात्र ८६४ रुपयांचे दिले. ही कारवाई पंचायत समिती कृषी अधिकारीअजय गवळी, तालुका कृषी अधिकारी गंगापूर बापूराव जायभाये व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रकाश पाटील छत्रपती संभाजीनगर यांच्या भरारी पथकाने करुन कृषी सेवा केंद्राच्या निलंबनाचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना पाठविण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजी नगर विभाग तुकारामजी मोटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजी नगर प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्याचप्रमाणे गंगापूर येथील इतरही दुकानासह लासुरस्टेशन येथील युवराज कृषी सेवा केंद्रात बियाणे उपलब्ध असतांना शेतकऱ्यांना विक्री करत नाही इत्यादी त्रुटीसह कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली सिद्धार्थ मशिनरी,कायगव रोड, गंगापूर कृषी सेवा केंद्राच्या अधिक दराने कपाशीची पाकिटे विक्री करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने तपासणी करून त्रुटींसह अहवाल माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास पाठवण्यात आला आहे, वैभव मशिनरी कृषी सेवा केंद्राची देखील तपासणी करण्यात आली असल्याची माहिती अजय गवळी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!