बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत असल्यामुळे शांततेने साजरे करावे.. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण

बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत असल्यामुळे शांततेने साजरे करावे.. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण

गंगापूर (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनला विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली अचानक भेट दिली.

 औरंगाबाद परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण हे रुजू झाले. त्यांनी अचानक गंगापूर पोलीस ठाणे येथे भेट दिली यावेळी सर्व नागरिकांना बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत असल्यामुळे
दोन्ही सण शांततेने साजरे करावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. गंगापूर पोलीस ठाण्याची संपूर्ण पाहणी केली व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले प्रभारी सपोनी शाईनाथ गिते, सपोनी अशोक चौरे, पोलिस उपनिरीक्षक शकील शेख दिपक औटी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!