गंगापूर करांचे औदार्य. गरीब रुग्णासाठी आठ तासात उभारला एक लाख अठरा हजार तीनशे साठ रुपयांचा निधी

गंगापूर (प्रतिनिधी) एक हाथ मदतीच्या या उक्रमातून गरीब रुग्णासाठी एका दिवसात एक लाख अठरा हजार तीनशे साठ रुपयांचा निधी जमा करून रुग्णाच्या नातेवाईकांना सुपुर्द केला.
गंगापूर शहरातील समर्थ संतोष लावंड या विद्यार्थ्याला अप्लास्टिक अँनीमीयाग्रस्त आजार झाला असून, त्याच्यावर उपचारासाठी जवळपास २९ लाख रुपये एवढा खर्च येणार असून सध्या त्याच्यावर वाडीया हॉस्पीटल मुंबई येथे उपचार सुरू आहे.लावंड कुटुंबांची आथिर्क परिस्थिती नाजूक असल्याने समर्थच्या उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून सर्व मित्रांनी एकत्र येत गंगापूर शहरात सकाळी ११ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात आठ तास पायी फिरत मदत फेरी काढून शहरातील प्रत्येक चौकातील व्यापारी, फेरीवाले, डॉक्टर, नागरिक, छोटे दुकानदार, टपरीचालक यांच्या कडे जाऊन स्वखुशीने समर्थ संतोष लवांड यांच्या उपचारांसाठी एक लाख, अठरा हजार, तीनशे साठ रुपये मदत निधी जमा करून रुग्ण समर्थ लवांड यांचे वडील संतोष लवांड यांच्या कडे सुपूर्द करून गंगापूर शहरात एक आदर्श निर्माण केला आहे.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जगताप, राहुल वानखेडे, राकेश कळसकर, नवनाथ कानडे, अख्तर सय्यद, गुलाम शहा, हनीफ बागवान,स्वप्नील गायकवाड, वैभव खाजेकर, फैसल बासोलान, नीलेश शेळके, सुमित साबणे, सागर शेजवळ, अजय बत्तिसे, राहुल साळवे, पप्पू टिके, आकाश बुचडे, गणेश राजपूत, अमर राजपूत, ओम शिर्के, सागर घोडके, आकाश मोरे, अमोल म्हसरुप, सलीम शहा, इरफान शेख, संदीप कनगरे, अर्जून कराळे, अशपाक सय्यद, अजय दहातोंडे,मनोज राऊत, सोनू भवार, आकाश बारहाते, रामेश्वर म्हस्के , करण खोमणे, अनिकेत काळे, केतन आरसुळ अविनाश गायकवाड यांच्या सह अमोल जगताप मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!