धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करा नसता तीव्र आंदोलनाचा इशारा गंगापूर धनगर कृती समितीने दिला.

धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करा नसता तीव्र आंदोलनाचा इशारा गंगापूर धनगर कृती समितीने *दिला.*
गंगापूर (प्रतिनिधी)सोलापूर येथील कार्यकर्त्याला मारहाण करण-यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करा नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर कृती समितीने दिला आहे
तहसीलदार सतीश सोनी यांना नुकतेच निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे की सोलापूर येथील धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली त्या कार्यक्रत्यास मारहाण करणाऱ्या मारेक-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच धनगर समाज एसटी आरक्षणाची आमंलबजावणी करून धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचीवर असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी नसता उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लावावा असे निवेदनामध्ये नमूद करून लवकरात लवकर धनगर आरक्षण अमलबजावणी संदर्भात कायदा करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली आहे या वेळी अरुण सागर, पृथ्वीराज तोगे,सचिन काळे, ज्ञानेश्वर डाव्हाण,नारायण सातपुते, विशाल काळे, योगेश पवार, रवींद्र मस्के, शुभम चव्हाण, अनंता कुठे अशोक करडे, बापूसाहेब पोकळे, सतीश मिसाळ, योगेश सातपुते, राम सातपुते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!