धक्का दायक .गंगापूर मध्ये महाराजांचा प्रताप.अल्पवयीन मुलीला फुस लावून पैसे व सोन्याच्या दागिन्यांसह पळवून नेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करुन मुलीची सुटका करा पित्याचा टाहो


गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून घरातील सोने व रोख १ लाख ७३ हजार रुपयासह पळवून नेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या महाराजांवर कारवाई करुन मुलीची सुटका करावी अशी मागणी मुलीच्या बापाने केली आहे.
पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगापूर शहरातील अमोल जनार्धन गंडे (महाराज), अविनाश उत्तम पाटील (महाराज), नामदेव औताडे, कृष्णा वाघ, काकासाहेब करडीले यांनी संगणमत करुन माझ्या अल्पवयीन मुलीस पाच तोळे सोन्याच्या वस्ता व नगदी रक्कम रु.१,७३,०००/- (अक्षरी एक लाख त्र्याहात्तर हजार रुपये) घेऊन ये असे सांगून वाईट हेतू / उद्देशासाठी पळवुन घेऊन जाऊन तिच्यावर बाललैंगिक अत्याचार करत असलेबाबतची‌ तक्रार अल्पवयीन मुलीचे वडील सुरेश आप्पासाहेब डोंगरे, रा. काटकर गल्ली, गंगापुर यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिली असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुढे तक्रारीत म्हटले आहे की
अविनाश उत्तम पाटील महाराज यांनी दिनांक१४/०५/२०२४ रोजी शिबीर सप्ताहाचे नियोजन त्याचे शेतात केले होते, अशा सप्ताहाचे निमीत्त करुन आरोपी हा जास्त वय झालेल्या महाराजांचे, मुलांचे अज्ञान,धार्मिक मुलींना आमिष दाखवुन पळवुन लावुन त्यांचे लग्न लावण्याचे बेकायदेशीर कृत्य करत असतो, त्याच्या सोबतचा अमोल जनार्धन गंडे यांनी माझी अज्ञान मुलगी हिच्यासोबत तिला धार्मिक आवड असल्याने सप्ताहात बोलावुन घेऊन अमोल गंडे याची ओळख करुन दिली व त्यांना सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पळुन जाण्यासाठी आर्थिक मदत करुन पळुन लावले आहे व इतर मदत करणारे हे मला मुलीची आशा सोडुन दे अशी धमकी देत आहे. वरील सर्वांनीअज्ञान मुलीस फुस लावुन व आमिष दाखवुन तिला पैसे व सोने घेऊन येण्यास सर्वांनी भाग पाडले व वाईट हेतूने तिला पळवुन घेऊन जावुन तिच्यावर बाललैंगिक अत्याचार करत असल्याबाबत मला समजले आहे.तसेच अविनाश पाटील हा पीडीतेस अमोल गंडे याच्यासोबत पळवुन लावल्यानंतर देवाचे खोटे नाव करुन त्याचे आश्रम सोडुन पळुन
गेला आहे. तुला किती पैसे पाहिजे ते सांग नसता तुझ्या मुलीचे तुला तोंडही दिसणार नाही,
तु जर पीडीतेचे लग्न माझ्याशी लावुन दिले तरच मी तुम्हाला तुमच्या मुलीस भेटु देईल नसता मी तुमच्या मुलीचे तोंड देखील दाखवणार नाही अशी धमकी अमोल गंडे याने इतर आरोपींशी संगणमत करुन मुलीच्या बापाला दररोज देत आहेत अज्ञान मुलीवर होत असलेल्या बाललैंगीक अत्याचार थांबवावा आणि तिची आरोपींच्या तावडीतुन सुटका करावी व सर्व आरोपींविरुध्द तात्काळ कठोरात कठोर कार्यवाही करुन त्यांना जेरबंद करावे व न्याय द्यावा अशी मागणी सुरेश आप्पासाहेब डोंगरे यांनी निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!