दुर्दैवी घटना.शेंदूरवादा येथे आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

गंगापूर प्रतिनीधी:
कमी उत्पन्न आणि वडिलांचा कर्जाचा बोजा वाढत असल्याने आर्थिक विवंचनेतून एका विवाहित तरुण शेतकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथे सोमवारी २७ मे रोजी सकाळी उघडकीस आली. योगेश बद्रीनाथ रांजणे (२९) असे फाशी घेतलेल्या शेतकऱ्याचे  नावे आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश बद्रीनाथ रांजणे यांची शेंदूरवादा शिवरात वडिलोपार्जित शेती आहे. कमी जास्त पर्जन्यमान, दरवर्षीच पिकाच्या  उत्पादनात होणारी घट, सततच्या नापिकीमूळे कुटुंबाचा कर्जाचा डोंगर वाढत जाऊन कर्जबाजारी झाले होते. त्यात यंदाही म्हणावे तसे पीकपाणी न झाल्याने उत्पन्न पाहिजे तेवढे मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या आर्थिक विवंचनेत तो होता. घरातील व्यवहार योगेश बघत असल्याने त्यांच्या कुटुंबात कर्ज व आर्थिक विवंचनेची चर्चा होत असे दरम्यान, सोमवारी सकाळी  योगेश आपल्या शेंदुरवादा शिवारातील गट नंबर २२६
मध्ये शेतात जनावरांना वैरण घेऊन येण्याच्या बहाण्याने  गेले होते. मात्र, तो  लवकर  घरी परतला नाही. त्यामूळे शोध घेतला असता शेतातील झाडाला योगेश लटकलेल्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला वडील बद्रीनाथ रांजणे, आनंदा निकम, हरिभाऊ सोलाट राजु सोलाट  यांनी ग्रामस्थांच्या साह्याने खाली घेऊन उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.वृत्त लिही पर्यंत या प्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चिमुकल्या मुलांचे छत्र हरवल्याने हळहळ…

योगेशला सहा वर्षाची मुलगी ज्ञानेश्वरी व चार वर्षाचा मुलगा चैतन्य असून अचानक योगेशनी टोकाचे पाऊल उचलल्याने या दोन्ही मुलाचे वडीलांचे छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!