दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथे मोबाईलवर रिल्स बनविणा-या तरुणीचा कारसह दरीत कोसळून, दुर्दैवी अंत. रिल बनविणे पडले महागात


खुलताबाद (प्रतिनिधी) खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रिल्स बनविणाऱी तेवीस वर्षीय युवती कारसह ३०० फुट खोल दरीत पडल्याने तिलाआपले प्राण गमवावे लागले या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदरील घटना सोमवारी १७ जुन रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली ,या घटनेतील मयत युवतीचे नांव श्वेता दिपक सुरवसे वय २३ वर्षे रा.हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर असे आहे.या विषयी मिळालेल्या माहितीनुसार श्वेता व तिचा मित्र सुरज संजय मुळे वय २५ रा.हनुमान नगर हे छत्रपती संभाजीनगर येथुन टोयाटो इटिऑस गाडी क्रमांक एम.एच.२१,बी.एच.०९५८ ने खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले असता खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ ही मुलगी कार चालवताना रील बनवत होती त्यावेळेस तिने कार रिवर्स घेतली कार वरचा तिचा ताबा सुटला आणि कार रिव्हर्सच मागे दरीत जाऊन कोसळली या अपघातात या युवतीचा मृत्यू झालाय.

या ठिकाणी मोबाईल वर रिल्स बनवयाला तिने मित्राला सांगितले मात्र ,रिव्हर्स गिअर पडुन,एक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन अंदाजी ३०० फुट खाली पडून गाडीचा चक्काचूर झाला
तर युवतीचा मृत्यु झाला.
सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असुन,पावसाळ्यात तो निसर्ग सोंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात,अशातच हे दोघेजण गुरुवारी १७ जुनला फिरायला आले,मोबाईलवर रिल्स बनवित असतांना घात झाला,मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती या परिसरात सौंदर्य निरीक्षण स्थळांवर त्वरित कठडे बसविण्यात यावे अशी मागणी पर्यटन प्रेमींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!