दिलासादायक.. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील सिध्दार्थ तुपेला दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार दंडाची शिक्षा तर संभाजी सिरसाठ निर्दोष

दिलासादायक.. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील सिध्दार्थ तुपेला दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार दंडाची शिक्षा तर संभाजी सिरसाठ निर्दोष


गंगापूर (प्रतिनिधी) अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीस बळजबरीने कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला वैजापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी दहा वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तर एकाची निर्दोष मुक्तता केली असुन दोन आरोपी अजुनही पसार आहे.

सिध्दार्थ अशोक तुपे (२४) रा. मालुंजा खु. ता गंगापूर जिल्हा संभाजीनगर असे शिक्षा ठोठविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी शिवारातील एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी सायंकाळच्या सुमारास ओट्यावर बसलेली होती. त्याचवेळी तिच्या घरातील सदस्य घरात जेवण करीत होते. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन बघितले असता ती गायब झालेली त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती सापडली नाही. घरातील सदस्यांचा सिध्दार्थ तुपे याच्यावर संशय असल्यामुळे त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी पाच ते सहा दिवसानंतर दोघांचाही शोध घेऊन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी ‘त्या’ मुलीचा जवाब घेतला असता, ८/१०/२०१७ रोजी सिध्दार्थ याने मला रस्त्यावर बोलावून बळजबरीने ओम्नी गाडीत ओढून तोंड दाबून गाडीत बसविले. गाडी नेवासा मार्गे कांगोणी येथे नेण्यात आली. दुसऱ्या दिवशी तेथे एका रुमवर नेवून माझ्यावर बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास माझ्या वडिलांसह बहिणीस जीवे मारण्याची धमकी त्याने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते यावरून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी भादवी कलम ३७६ (१)३६६ अ ३६३, ५०६, ३४ सह ३ (अ ),४,८,१२ लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण आदी नि २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून वैजापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सुरू असताना आरोपी तुरुंगात होता. सरकार पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात पीडितेची साक्ष व अन्य पुरावे महत्वाचे ठरले. दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी आरोपी सिध्दार्थ तुपे याला कलम 376 अन्वये 10 वर्षांच्या सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी व कलम 506 अन्वये सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोक्सोसह ( बाललैंगिक अत्याचार कायदा) व अपहरणाच्या कलमातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय या खटल्यातून संभाजी अरुण सिरसाठ यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यातील अनिल कवडे व अश्विनी गवळी हे दोघेजण अजूनही फरार आहेत. सरकार पक्षातर्फे ॲड. कैलास पवार यांनी काम पाहिले
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!