तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण,कलारत्न,आदर्श शिक्षक, सावित्रीच्या लेकी पुरस्काराचे वितरण

तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण,कलारत्न,आदर्श शिक्षक, सावित्रीच्या लेकी पुरस्काराचे वितरण

नेवासा(प्रतिनिधी)सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या तेजस फाउंडेशन नाशिक या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार व कलारत्न पुरस्कार,सावित्रीच्या लेकी पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ .बापू देसाई,अँड.एस.आर.बोदडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभिनेते एल.पी. चव्हाण,कवी महेंद्र तुपे सिनेअभिनेत्री व तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा मेघा डोळस, रणजित कौर,वकील, सामाजिक कार्यकर्त्या यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमात श्रीमती सोनाली दिलीप देवरे,मदन गायकवाड,ऋषीता सूर्यकांत भालेराव,सूर्यकांत रखमाजी भालेराव ,सीमा दाभाडे,सुरेशभाऊ डोळस, रंजिता कौर सौ. विजया कातकडे, नियाज अहमद चौगुले, सागर उर्फ ऋतीक मुकुंद कट्यारे,दिलीप घेवंदे,संजय लोंढे, सविता आवारे, डॉ.लक्ष्मीकांत कलमुर्ग,गजानन सुरडकर,डॉ.सागर दिगंबर गुडमेवार,अभिजित कालेकर,मनीषा रायकर,रतनकुमार पंडागळे कोकिळा वानखेडे, सुनील राजपूत आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे सुंदर असे निवेदन पंकज शिंदे यांनी केले सादर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश आरे गणेश वाघ यांचे सहकार्य लाभले तर कवी उत्तमराव म्हस्के यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!