गंगापूर येथे अवैध ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर विशेष पथकाची धाड एक ताब्यात


गंगापूर (प्रतिनिधी) अवैध ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर विशेष पथकाच्या धाडीत २१ हजारांचा मुद्देमाल संगणकासह एक जण ताब्यात.
गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजीव गांधी चौकात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या विजय रुपचंद गायकवाड, वय २७ वर्ष रा. अहिल्यादेवीनगर गंगापुर ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील राजीव गांधी चौकात पत्र्याच्या शटरमध्ये लोकांकडुन पैसे घेवुन पैशावर (संगणक) कॉम्युटरवर अवैधरित्या ऑनलाईन गेम चक्री नावाचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळवितांना पकडण्यात आले.या छाप्यात एलसीडी मॉनिटर, सीपीयू, किबोर्ड, रोख रक्कम असे एकूण २१,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यांच्या विरुध्द कलम १२(अ) मुंःजु.कायदा प्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हवालदार नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापसे,विष्णू गायकवाड,गणेश सोनवणे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!