गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय बंद होण्याच्या मार्गावर प्रभारी दुय्यम निबंधक पदाचा पदभार काढून घेण्याची दुय्यम निबंधकाने केली मागणी

गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय बंद होण्याच्या मार्गावर
प्रभारी दुय्यम निबंधक पदाचा पदभार काढून घेण्याची दुय्यम निबंधकाने केली मागणी.


गंगापूर (प्रतिनिधी)

गंगापूर दुय्यम निबंधक श्रेणी – १ हे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अधिका-यांचा या पदावर काम करण्यास नकार देत असल्याने हे कार्यालय बंद होण्याच्या मार्गावर. येथील दुय्यम निबंधकांच्या विरोधात कायम तक्रारीमुळे या जागेचा पदभाराला सतरा अधिका-यानी लेखीदेवुन नकाराल्याने अखेर दुय्यम निबंधक कार्यालयाचा प्रभारी पदभार औदुंबर लाटे यांच्याकडे सोपविण्यात आला होता परंतु त्यांच्या विरोधात भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने गंगापूरचा पदभार काढून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज दाखल केला आहे.

सह जिल्हा निबंधक वर्ग-1
तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, औरंगाबाद. यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि, दुय्यम निबंधक श्रेणी – १ गंगापूर या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आस्थापनेवरील एकही अधिकारी व कर्मचारी तयार होत नसल्याने औदुंबर लाटे दुय्यम निबंधक श्रेणी-१ गंगापूर या पदाचा पदभार पुढील आदेशापर्यंत देण्यात आला होता.१६ मे रोजी दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी अधिकारी व कर्मचारी तयार नसल्याने त्या दिवशी दुय्यम निबंधक श्रेणी-१ गंगापूर हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.परंतु १७ मे रोजी औदुंबर लाटे यांनी पदाचा पदभार स्वीकारला होता.
या पदावर काम करताना ज्या व्यक्तीचा कधीही दुय्यम निबंधक कार्यालयाशी स्थावर व जंगम मालमत्तेचे दस्त नोंदणी संदर्भात काहीही संबंध आलेला नाही, अश्या त्रयस्थ व्यक्ती चुकीच्या पद्धतीने अश्या सांविधानिक पदाचा अवमान होईल व विभागाची जनमाणसातील प्रतिमा मलीन होईल असे सोशल मिडीयावर पोस्टर अपलोड करून अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. व अधिकाऱ्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने आंदोलनाची भूमिका घेत असल्याने दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर या पदावर लोकसेवक म्हणून माझ्या पदाची जबाबदारी, प्रतिष्ठा, कर्तव्य, निष्ठेने व प्रामाणिकपणे व निःपक्षपातीने पार पाडत असल्याताना काही त्रयस्थ व्यक्तींकडून बदनामीजनक पोस्ट सोशल मिडीयावर प्रसिद्ध करून चुकीच्या पद्धतीने आंदोलन करण्याचे निवेदन वरिष्ठ कार्यालयास प्रसिद्ध करून अशोभनीय असे आरोप अधिकारी यांच्यावर केले जात आहेत. त्या मुळे लाटे यांनी संबंधित व्यक्तींच्या अश्या गैरवर्तनाने आपल्या विभागाची जन माणसातील प्रतिमा मलीन होत असल्याने दुय्यम निबंधक श्रेणी-१ गंगापूर या पदाचा पदभार काढून घेण्यासाठी औदुंबर लाटे यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!