गंगापूर खुलताबाद मतदारसंघात शांततेत.६१.७५ टक्के मतदान झाले


गंगापुर (प्रतिनिधी )
औरंगाबाद लोकसभा १११ मतदारसंघातील गंगापुर खुलताबाद विधानसभा मतदार संघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६१.७५  टक्के मतदान झाले. तर गंगापूर शहरात ५९ टक्के मतदान झाले.मशीन बंद पडण्याचे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले असल्याचे सांगण्यात आले. 

गंगापुर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी सावंगी लासुरस्टेशन येथील कुटुंबिया सोबत मतदानाचा हक्क बजावला. ४४८  केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही ठिकाणी मतदान यंत्रात झालेल्या तांत्रिक बिघाडाचे प्रकार वगळता सर्व काही सुरळीतपणे मतदान झाले असल्याचे सहाय्यक  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी खुलताबादचे तहसीलदार कंकाळ यांनी सांगितले. या वेळी सकाळी ९ वाजता ५.५४, ११ वाजता १०.९४, टक्के तर ३ वाजता ४२.८८ टक्के मतदान झाले तर ५
वाजेपर्यंत ५४.५२ टक्के मतदान झाले होते. निवडणूक मैदानात असलेल्या ३७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सायंकाळी सहा वाजता मतदान यंत्रात बंद झाले.उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही दुपारी शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदाराची गर्दी झाली होती.परंतु गंगापुरच्या इतिहासात प्रथमच  सायंकाळी सहा वाजता एकाही बुथवर मतदाराची रांग नव्हती.संध्याकाळी सहा वाजे पर्यंत ६१.७५ टक्के मतदान झाल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी शिंदे यांनी कळवले.रात्री साडे आठ वाजेपर्यंत जोगेश्वरी, वाळुज गाजगाव व खुलताबाद तालुक्यात चार ते पाच बुथवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला रात्री सर्व मतपेटी जमा करून रात्रीतून मतपेटी छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात येणार आहे.

गंगापूर तालुक्यातील जामगांव येथील अपंग अर्जुन मच्छिंद्र रासने याने मतदान केले . ने आन करण्यासाठी रिक्षा नसल्याने मामा पन्नु कंदे यांनी उचलून मतदान केंद्रावर नेले होते.


छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गंगापूर शहरातील नगरपरिषदेच्या मतदान केंद्राला भेट देऊन पोलिसांना सुचना केल्या यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत,गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!