गंगापूरचे पोलीस निरिक्षक सत्यजित ताईतवाले यांची तडकाफडकी बदली. पोलीस निरिक्षक कुमारसिंग राठोड यांनी पदभार स्विकारला

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांची सायबर क्राईमला तर सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांची तडकाफडकी बदली गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून राठोड यांनी गंगापूर पोलिस स्टेशनचा पदभार २६ जुन रोजी सकाळी आकरा वाजता स्वीकारला.
पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेकदा गौरव केला परंतु एकाच वर्षात त्यांची तडकाफडकी बदली का केली अशी चर्चा शहरात सकाळपासून सुरू होती.सकाळी ११ वाजता सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्याकडून गंगापूर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला असता शहरातील नागरिक व व्यापा-यांनी ताईतवाले यांना निरोप दिला तर कुमारसिंग राठोड यांचा सत्कार करुन दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!