उपमुख्यमंत्री यांच्या स्वागताची जय्यत तयारी

उपमुख्यमंत्री यांच्या स्वागताची जय्यत तयारी
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गावांना हर घर नल से जल या योजनेचा शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.
गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गावांना हर घर नल से जल या योजनेची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या जलजीवन मिशन अंतर्गत
१ हजार ७५ कोटी रुपये योजनेच्या शुभारंभ ३० जुन रोजी सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गंगापूर -खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गांवातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कायमचा प्रश्न सोडविल्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


हा कार्यक्रम २५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत होणार असून यासाठी पाच एकर मध्ये जय्यत तयारी सुरू असून रज्जाक पठाण, रवींद्र चव्हाण, कृष्णकांत व्यवहारे, अतुल रासकर, प्रशांत मुळे आदीं या सभामंडपाच्या कामाची व रस्त्याचे व अंतरंग कामे करत आहे. शासकीय योजनांच्या लाभार्थींना जागेवर योजना मंजूर करून पत्र देण्यासाठी अनेक विभागवार स्टाॅल लावण्याचे काम प्रगतीपथावर असून या कार्यक्रमाला गंगापूर वैजापूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!