आषाढी एकादशी असल्याने गंगापूरच्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचे जाहीर केले

आषाढी एकादशी असल्याने गंगापूरच्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचे जाहीर केले
गंगापूर (प्रतिनिधी) बकरी ईद व आषाढी एकादशी
हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत
असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी
ईदच्या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचे लेखी पत्र पोलीसांना दिले आहे.
गंगापूर पोलिसठाण्यात २३ जुन शुक्रवारी घेण्यात आलेल्या शांतता
समितीच्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व प्रभारी सा.पोलिस निरीक्षक साईनाथ गिते यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर येथे याबाबत बैठक घेण्यात आली. दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करावा, असे
आवाहन त्यांनी केले.
दोन्ही सन वर्षातुन एकदाच येतात. हे दोन्ही सन एकाच दिवशी आल्याने
सामाजिक तेढ निर्माण होवु नये, व दोन्ही समाजांच्या कार्यक्रमांना गालबोट लागु नये या करिता
रोजी २३ जुन रोजी शुक्रवारी जमीयत अलमा ऐ हिंद यांच्या कार्यालयावर सांयकाळी ४ वाजता गंगापूर शहरातील मुस्लीम बांधवांनी बैठक घेऊन निर्णय घेतलेला आहे की
सायंकाळी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत आषाढी एकादशी असल्याने हिंदू धार्मियांचा आदर ठेवून ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारची कुर्बानी करणार नसल्याबाबत चे लेखी पत्र.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते यांच्या कडे देण्यात आले यावेळी मौलाना मोबीन, मौलाना युसुफ, अध्यक्ष जीमयत उत्माए हिंद गंगापूर,खालेद नहादी
फैसल बामसक (चाऊस), अलीम चाऊस, बदर जहुरी, मुनाफ कुरेशी,वाजीद कुरेशी, आलीम कुरेशी, गुलाम शाहा, अख्तर सय्यद, मुसा खान, नवाब शेख, आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!