अबब.बीडच्या पोलीस निरीक्षकाच्या घरात एक कोटी रोकडसह सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकारी चक्रावले

बिड (प्रतिनिधी) गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पोलिस निरीक्षक खाडे यांनी या दोघांकडे ५० लाख, अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अखेर ३० लाखात तडजोड करून ५ लाख रुपयांची लाच स्विकारणा-या हरिभाऊ खाडे यांच्याकडे सापडली करोडोंची संपत्ती.


बिड शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ७ , १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील मुख्य आरोपी आर्थिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे हे फरार असल्याने व त्यांचे चानक्य पुरी बीड येथील किरायाचे राहते घर कुलुप बंद असल्याने १५ मे रोजी सिल बंद करुन पहारेकरी नेमण्यात आले होते .
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार १६ मे रोजी विशेष न्यायालय बीड यांचेकडुन सि.आर. पी. सी. कलम १०० नुसार सर्च वॅारंट प्राप्त करुन
लोकसेवक हरिभाऊ खाडे यांचे चानक्य पुरी बीड येथील राहाते घराची पंचा समक्ष घर झडती घेतली असता १ कोटी ८ लाख ७६ हजार ५२८ रुपये
सोन्याचे बिस्कीट व दागिणे एकुण ९ किलो ७० ग्रॅम किंमत अंदाजे ७२ लाख रुपये चांदी ५ किलो ५०० ग्रॅम किंमत अंदाजे ४ लाख ६२ हजार रुपये व स्थावर मालमत्ता :
१) फ्लॅट – बारामती
२) फ्लॅट – इंदापूर
३) व्यापारी गाळा – इंदापूर
४) प्लॉट- बारामती
५) प्लॅाट – परळी
व इतर मालमत्तेची कागदपत्रे ,
रोख रक्कम व मौल्यवान दागिणे मिळुन आले आहेत सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुण ताब्यात घेण्यात आला आहे. 
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे , पोलीस निरीक्षक युनुस शेख ,अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी , हनुमंत गोरे , अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे,संतोष राठोड , सुदर्शन निकाळजे या घरजडती पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!