पिंपळवाडी येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू तर पत्नीला फासावर लटकले गावातील नागरिक आल्याने महिलेचे प्राण वाचले चोरट्यांनी ठोकली धूम

गंगापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपळवाडी गावालगत राहणाऱ्या वृद्ध दांपत्यांना दरोडेखोरांनी जबर मारहाण करून रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने लुटून नेले महिलेने बिबट्याचा आवाज काढल्यामुळे गांवातील नागरिक आवाजाच्या दिशेने आल्याने चोरटे पळून गेले वृद्ध महिलेला फासावरुन खाली काढून छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत पाठवले असता डॉक्टरांनी वृद्धाला मृत घोषित केले

गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथे बटाईने घेतलेल्या गावाजवळील शेतवस्तीवर राहणारे परसराम लालचंद पवार वय ७० वर्ष मुळराहणार हतनूर ता.कन्नड हे दोन तीन वर्षपासून पिंपलवाडी येथे नवरा बायको राहत होते.मंगळवारी ४ जुन रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी परसराम यांच्या डोक्यात फावड्याने वार करून जबर मारहाण केली यात वृद्ध परसराम पवार हे गंभीर जखमी झाले तर त्यांची वृद्ध पत्नी लताबाई परसराम पवार वय ६५ यांना मारहाण करून हात मोडला व पायावर गंभीर दुखापत करुन घरातून त्यांनी दोन मंगळसूत्र सात ग्रॅम,एक कानातील टॉप्स तीन ग्रॅम , ७ हजार रुपये रोख व एक साधा मोबाईल असा ऐवज चोरला व घरातील सामान अस्तव्यस्त केल्यांनतर लताबाईला उपरण्याने फाशी देण्याचा प्रयत्न करत असताना ति ओरडल्याने तिच्या तोंडातून बिबट्याचा आवाज आला आवाजामुळे गावकरी मदतीला धावले असता चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.गांवक-यांनी
जखमींना छत्रपती संभाजी नगर येथील घाटी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी वृद्ध परसराम यांना तपासून मृत घोषित केले तर पत्नीचा उजवा हात मोडलेला असून कंबर आणि पायाला जबर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत ,पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले , पोलिस अमोल कांबळे, अभिजित डहाळे यांनी धाव घेतली सकाळी श्वान पथक,फिंगर प्रिंट एक्स्पर्ट यांना पाचारण करण्यात आले होते. सकाळी सवा दहाला ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलीसांना सुचना दिल्या.
परसराम पवार यांना चार मुलं, चार मुली असून ते सर्व गावाकडे राहत होते. वृद्ध पती पत्नी दांपत्य पिंपळवाडी येथे शेती कसण्यासाठी आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपी धरला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!