दरोड्यातील आरोपीला जानुन बुजुन वैजापूर पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप. आरोपीला अटक न केल्यास उपोषणाचा इशारा


वैजापूर (प्रतिनिधी) माऊली तोडमल या दरोड्यातील आरोपीला वैजापूर पोलीसांचे अभय. अटक न करता त्यास संरक्षण देत पाठीशी घालण्याचा प्रयत्न. आरोपीला त्वरित अटक करा नसता आमरण उपोषणाचा इशारा वाणी यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांना वैजापूर तालुक्यातील भायगांव येथील नवनाथ काशिनाथ वाणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माऊली तोडमल यांच्यावर वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये 395, 341, 427, 504, 506 असा गुन्हा असुन त्याचा सी.आर.नं. 0627 आहे तोडमलचा अटकपूर्व जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर व वैजापूरच्या न्यायालयाने फेटाळला असुन जवळपास 6 महिन्यापासुन आरोपी माऊली हा नेवासा येथे आहे व नेवासा पोलीस स्टेशन येथे तो खोट्या नाट्या तक्रारी देत आहे असे असतांना तो फरार असतांना संबंधित पोलीस स्टेशन त्यास अटक का करत नाही. जर आरोपी हा गुन्हामध्ये फरार असतांना वैजापूर पोलीसांनी नेवासा पोलीसाबरोबर संपर्क करावयास हवा होता. परंतु जाणिवपुर्वक तपासी अधिकारी कार्यवाही करत नाही. फरार आरोपी तोडमल यास त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा नवनाथ काशिनाथ वाणी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!