गावठाण हद्दीतील विस्तार झालेल्या भागाची सिटी सर्व्हे मध्ये नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव पाठवावा- जिल्हा अधीक्षक विजय विर

*गावठाण हद्दीतील विस्तार झालेल्या भागाची सिटी सर्व्हे मध्ये नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव पाठवावा- जिल्हा अधीक्षक विजय विर*
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील शहरासह अकरा गावाचा सिटीसर्व्हे झालेला असुन अनेक गांवाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेल्या आहे विस्तार झालेल्या भागाची नोंद सिटीसर्व्हे मध्ये घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव घेऊन तो भुमीअभिलेख कार्यालयांकडे पाठवावा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून विस्तारीत भागातील घरांची नोंद घेता येईल जिल्हा भुमीअभिलेख अधीक्षक विजय विर

गंगापूर तालुका भुमीअभिलेख कार्यालयांमध्ये जिल्हा भुमीअभिलेख अधीक्षक विजय विर हे आले असता त्यांच्याशी गंगापूरचे प्रभारी दुय्यम निबंधक औदुंबर लाटे, पत्रकार विजय बन्सोड,अलीम चाऊस, इब्राहिम शेख यांनी तालुक्यातील गांवाच्या विस्तार झालेल्या भागातील घरांचा समावेश सिटी सर्व्हे मध्ये कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली यामध्ये गावठाणांचा सिटी सर्व्हे न झाल्याने गरजेपोटीची बांधकामे अनधिकृत ठरविली जात आहेत; परंतू गावठाणांचा सिटी सर्व्हे करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांनी विस्तार झालेल्या भागाची सिटी सर्व्हे मध्ये नोंद घ्यावी यासाठी ठराव घेऊन भूमी व अभिलेख विभागाकडे पाठविल्यास आलेले प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे गावठाणातील सिटी सर्व्हे करण्यासंदर्भात सर्वोतोपरी मदत करण्याचे दुय्यम निबंधक औदुंबर लाटे, पत्रकार विजय बन्सोड,अलीम चाऊस, इब्राहिम शेख तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांनी सांगितले गंगापूर शहरासह आकरा गावांचे गावठाण भूमापन होऊन या गावांचे अधिकार अभिलेख नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. उर्वरित गावठाणांचा सर्व्हे झाल्यानंतर गावठाणातील गावांच्या विकासाची वाट मोकळी होणार आहे.

(गंगापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठाण हद्दीबाहेर बांधकाम करण्यात आले आहे परंतु या बांधकामाची सिटी सर्व्हे मध्ये नोंद
नसल्याने अनेक अडचणी येतात त्यासाठी ग्रामपंचायतीने विकासीत भागाचा सिटी सर्व्हेत नोंद घेण्यासाठी प्रस्ताव पाठवावे या नोंदी साठी प्रयत्न करणार प्रभारी दुय्यम निबंधक औदुंबर लाटे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!