गंगापूर नगर पालिका आवारात ३० ऑगस्टला प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे -प्रताप साळुंके

गंगापूर नगर पालिका हद्दीत मुत्र विसर्जन करण्यासाठी महीला व पुरुषांची कुचंबणा थांबवावी यासाठी मुत्र विसर्जन आंदोलन ३० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे

गंगापूर नगर पालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे -प्रताप साळुंके

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर नगर पालिका हद्दीत मुत्र विसर्जन करण्यासाठी महीला व पुरुषांची कुचंबणा थांबवावी यासाठी मुत्र विसर्जन आंदोलन ३० ऑगस्ट रोजी करण्याचा इशारा दिला आहे

गंगापूर शहरातील मुख्य चौकात महिला व पुरुषासाठी स्वच्छता गृह बांधावे या मागणी साठी प्रताप साळुंके यांनी १४ ऑगस्ट रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन.दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गंगापूर नगरपालिका मध्ये सामान्य नागरिक व बाजार पेठेतील व्यापारी यांच्या समवेत नगर पालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत समाजसेवक प्रताप साळुंके यांनी दिली
शहरात मूख्य रस्त्या लगत पुरुषांसाठी व महिलासाठी एकही स्वच्छता गृह नाही त्यामुळे परिसरातील व बाहेर गावाहून येणारे नागरिक व व्यापारी यांचे मोठे हाल होत आहे तसेच महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात
स्वच्छतागृह नाही
अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगर पालिके कडे स्वच्छता गृहाची मागणी केली मात्र
यांच्या मागणीकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून शहरातील नागरिकांच्यावतीने नगरपालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहेत या साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजसेवक प्रतापराव साळुंके यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!