गंगापूरमधून डुक्कर चोरणाऱ्या दोन भामट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले .

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील अहिल्यादेवी नगर येथुन अमेरिकन शार्क जातीचे पाच वराह (डुक्कर) रिक्षात टाकून घेवुन जाताना सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय सुरुपचंद गायकवाड रा.अहिल्यादेवी नगर, यांचे पांढऱ्या रंगाचे अमेरिकन शार्क जातीचे वराह (डुक्कर) जनावरे ज्याचे वयअंदाजे दोन ते अडीच वर्ष यांना १२ जुन रोजी साडे तीन वाजेच्या सुमारास रिक्षा क्रमांक एम एच १२ ए आर ००८५ मध्ये टाकुन घेऊन जात असताना नागरिकांनी शुभम दिलीप लाहोरे वय-२३ वर्ष 2) सुरज चापसिंग दुलगंच दोन्ही रा. बलभीमनगर, बीड जि. बीड या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले त्यांच्या ताब्यातुन ९० हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची जुनी वापरती रिक्षा व ७५ हजार किमतीचे ५ पांढऱ्या रंगाचे अमेरिकन शार्क जातीचे वराह (डुक्कर) जनावरे असा एकून १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम दिलीप लाहोरे व सुरज चापसिंग दुलगंच यांच्या विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७९,५११,३४ भा.द.वि. प्रमाणे दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!