या लोकसभा निवडणुकीत भाजपचा २०० च्या वर आकडा जाणार नाही आबकी बार भारतीय जनता पार्टी तडीपार.विरोधीपक्षनेते अंबादास दानवे.


गंगापूर (प्रतिनिधी) ही लढाई गद्दार व्हर्सेस शिवसेना अशी राहिल. ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची आहे देशाची आहे अनेक पक्ष फोडले शिंदेला काय नाही दिलं तरीही गद्दारी केली.जुन्या मतदारांना धनुष्यबाणाला मतदान करण्याची सवय आहे ते आता मतदारांना सागण्याची गरज असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर येथील शिवकृपा मंगल कार्यालयात १६ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते पुढे बोलताना सांगितले की मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दारुचा घोटाळा केला म्हणून आत टाकले चांगले काम करणाऱ्याच्या विरोधात मोदी सरकार आहे आता शेतमालाचा भाव दुष्काळ असे अनेक मुद्दे गावा गावात सांगायचे आहे. अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की भाजपचा लोकसभेच्या निवडणुकीत २०० च्या वर आकडा जाणार नाही आबकी बार भारतीय जनता पार्टी तडीपार असा नारा लावला.भाजपला अनेक ठिकाणी उमेदवार भेटेना भाजपने सर्वांचीच ईनकाॅयरी लावली आहे.
गंगापूर येथे आयोजित बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला.
या मेळाव्यास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे , विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे , विभागीय सचिव अशोक पटवर्धन , लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद खोपडे , जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोंणगावकर, लता पगारे , लोकसभा जिल्हा संघटक सुदाम सोनवने, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी किरण पाटील डोणगावकर जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस, जगन्नाथ खोसरे, नईम मंन्सूरी, काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय मनाळ, शहर प्रमुख सागर दळवी. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष विलास चव्हाण, विश्वजीत चव्हाण, ज्ञानेश्वर निळं, वाल्मीक शिरसाट, महिंद्र राऊत, काँग्रेसचे भागवतराव काळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अहमद पटेल, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विजय गायके, जिल्हाध्यक्ष धनश्रीताई कांबळे,संजना महाडीक ,अर्चना सोमासे,. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अविनाश पाटिल, अंकुश सुंब, राजू इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, राजू वरकड, युवा सेना जिल्हाधिकारी मच्छिंद्र देवकर, युवा सेना जिल्हा समन्वयक मयूर जैसवाल, युवा सेना जिल्हा चिटनिस पांडुरंग कापे,युवा सेना ता.अधिकारी ऋषिकेश धाट, अमोल चौहान,उपतालुका प्रमुख पोपट गाडेकर, लखन सुपेकर , संजय जैस्वाल, रावसाहेब टेके, रमेश आरगडे,मनोज जैस्वाल,माजी दिलीप धाट,दत्तत्राय दारुंटे, शहर प्रमुख भाग्येश गंगवाल,महिला आघाडी अर्चना सोमासे, रुक्मिणी राजपूत ,विजय पानकडे, उपशहर प्रमुख श्रीलाल गायकवाड, कैलास साबणे,प्रकाश परोडकर,आबासाहेब सिरसाठ, प्रशांत पंढुरे, स्वामी राजपूत,धीरज गायकवाड,गोविंद वल्ले, अमेय जंगम, अजीत राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!