बस चालक-वाहकांचा मनमानी कारभार ! बसस्थानकावर गाडी नेण्यास नियमबाह्य नकार

बस चालक-वाहकांचा मनमानी कारभार ! बसस्थानकावर गाडी नेण्यास नियमबाह्य नकार

सर्व लांब पल्ल्याच्या बस गाड्यांना बसस्थानकात येणे अनिवार्य करावे प्रवाशांची मागणी

गंगापूर (प्रतिनिधी) लांब पल्ल्याच्या बसचे चालक-वाहक गंगापूर बसस्थानकावर बस न नेता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून च वैजापूर मार्ग बाहेरूनच बस नेत असल्याने प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत. वास्तविक पाहता, सर्व गाड्यांना गंगापूर बसस्थानकात बस आणणे अनिवार्य असताना काही चालक-वाहकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
औरंगाबाद, जालना, परतुर, जाफराबाद, सिल्लोड, अकोला, गंगाखेड, हिंगोली,
आदी ठिकाणची बससेवा गंगापूर मार्गे नासिक ला जातात. या सर्व बसना एसटी महामंडळाने गंगापूर बसस्थानकात बस आणणे अनिवार्य असताना काही चालक आणि वाहकांकडून अजूनही प्रवाशांशी हुज्जत घालून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोडले जात आहे. वास्तविक पाहता कोरानाच्या काळात बससेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक महिने कामगारांचे वेतन करणेही शक्‍य झाले नव्हते. त्यानंतर ही घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक असताना प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळ विविध योजनांची अंमलबजावणी करते. एसटीला प्रवाशी मिळावे व ज्यादा नफा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने योजना अमलात आणले आहे.
३ जुन शनिवार रोजी औरंगाबाद नाशिक बस गंगापूर मार्ग वैजापूर कडे जात असताना चालक-वाहकांच्या मनमानीपणामुळे बसमध्ये बसलेल्या ७ ते ८ प्रवाशांना भर दुपारी कडक उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरुन दिले विशेष म्हणजे चालक आणि वाहकाने प्रवाशांन बस गंगापूर बसस्थानकावर जाणार नसल्याचे कारण सांगत खाली उतरविले. विशेष म्हणजे या गाडीत अवघे दहा ते बाराच प्रवासी होते. तेवढ्याच प्रवाशांना घेऊन ही बस वैजापूर मार्गस्थ झाली,
आणि काही प्रवासी वैजापूर नासिक जाण्यासाठी बसस्थानकावरच बस ची वाट पाहत बसले,
काही वाहक आणि चालक प्रवाशांना नाहक त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसस्थानकात येणे अनिवार्य करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!