खान की बाण या मुद्द्यावर चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या चंद्रकांत खैरे यांचा बाण कुठे गेला? असे म्हणत ओवेसी यांनी टोला लगावला.



गंगापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांनी मागील दोन वर्षात कपडे बदलतात तसे जोकरासारखे पक्ष बदलले त्यामुळे या जोकरांना घरी पाठवल्याशिवाय मतदार राहणार नाही असा विश्वास एमआयएमचे प्रमुख असदूद्दीन ओवेसी यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत बोलताना केले..


एमआयएमचे खासदार जलिल यांनी गतकाळात लोकसभेमध्ये सर्व समाजातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले.
तीस-चाळीस वर्षांत जे कधी रमजान ईदच्या शुभेच्छा द्यायला आले नाहीत, ते आता दिसू लागले आहेत, हा इम्तियाज जलील यांना तुम्ही निवडून दिल्याचा परिणाम असल्याचे ओवेसी म्हणाले. इम्तियाज जलील यांच्या कामाचे कौतुक करताना ते मुसलमान असूनही त्यांनी मंदिराच्या कामासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत आम्ही दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवत नाही. इम्तियाज जलील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, खेळाडू अशा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांना 2019 मध्ये निवडून पाठवले आणि तुमची ताकद दाखवून दिली. त्याचाच परिणाम आहे की जे कधी ईदच्या शुभेच्छा द्यायला येत नव्हते ते आता दिसू लागले आहेत.
खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या केलेल्या भावनिक आवाहनाची खिल्ली उडवताना तुमची शेवटची निवडणूक २०१९ मध्ये झाली, असा चिमटा काढत इम्तियाज जलील यांच्या विजयाचा दावा केला. एकूणच ओवेसी यांच्या भाषणाचा रोख हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर दिसून आला. या निवडणुकीत खैरे यांच्याशीच इम्तियाज यांची लढत असणार आहे, हे ओवेसींच्या भाषणातून स्पष्ट झाले. महायुती, वंचितच्या उमेदवारांची दखल ओवेसींनी घेतली नाही. वंचितशी युती तुटली तरी एमआयएम संभाजीनगरात विजय मिळवू शकते, असा विश्वास ओवेसी व्यक्त करताना दिसत आहेत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निवडणुकीच्या दरम्यान करत असलेल्या भाषणांमध्ये मासबंदीच्या उच्चार करत आहे. मांस खाण्याबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दिलेले इलेक्टोरल बॉण्ड कसे चालतात? असा रोकडा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयएम पक्षातर्फे खासदार इम्तियाज जलील हे उमेदवार आहेत. इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. ओवेसी यांची गंगापूर तालुक्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!