स्वातंत्र्यानंतर तब्बल ६९ गावांना मिळणार चोवीसतास वीज ; गंगापूर खुलताबाद तालुक्यात ८५ कोटी रुपयांची कामे सुरू. तर २४० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी व उर्वरित २१४ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव शासनस्तरावर दाखल- आमदार प्रशांत बंब .

गंगापूर (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेले नद्या नाल्यांचे खोलीकरण, आत्ताच मंजूर झालेली गंगापूर उपसा जलसिंचन योजना अशा विविध योजनांमुळे विहिरींना, नद्यांना व तळ्याना मुबलक पाणी साठा वाढला व त्यातून शेतीसाठी शेतकऱ्यांची तथा औद्योगिक आणि इतर ग्राहकांची वीज मागणी वाढली. भविष्यात विजेचा वाढता खप व मागणी लक्षात घेता मतदार संघात राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदार संघात महावितरणाचे मोठे जाळे विणत असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगून मागील ४८ वर्षात जितके काम झाले नाही तितके काम मागील काही वर्षात मंजूर करून गावा गावात तब्बल २५० कोटीच्या कामांना मंजुरी मिळवली आणि त्यातून प्रत्यक्ष ८५ कोटी रुपयांची गावठाण फिडरची कामे सुरू असून आणखी २४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीसाठी दाखल केला आहे येत्या मार्च महिन्यात त्यास मंजुरी मिळेल. अशी माहितीही बंब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लासुर स्टेशन येथे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील मंजूर करून आणलेल्या महावितरणाच्या कामासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव जाधव भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण. रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, संदीप गायकवाड, अभिजित मालोदे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बंब म्हणाले की, गंगापूर खुलताबाद तालुक्यासाठी ८५ कोटी रुपयांची महावितरणाची कामे सुरू असून त्यात ११ केव्हीच्या २५ वाहिन्यांद्वारे ६९ गावांना चोवीसतास गावठाण वीज पुरवठा केला जाणार आहे. गावांतर्गत ११२ किमी पर्यंत ए.बी. केबल टाकणे, सिंगल फेज रोहित्र काढून त्या ठिकाणी नवीन १०० केव्हीचे रोहित्र बसविणे, होल्टेज वाढवण्यासाठी कॅपॅसिटर बँक टाकणे, ३३ केव्हीच्या ३० किलोमीटर पर्यंत तारा बदलणे, ११ केव्ही च्या ७५ किलोमीटर पर्यंत तारा बदलणे, एल टी लाईन च्या ९९ किलोमीटर पर्यंत तारा बदलणे, आदी कामे सुरू आहे.
त्याचबरोबर उर्वरित १६० कोटी रुपयांच्या कामांमध्ये गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे २२० केव्हीचे नवीन महापरेषाण उपकेंद्र मंजूर केले आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्याला १३२ केव्हीचे गंगापूर व मुरमी येथे दोन उपकेंद्र मंजूर होऊन यातून १५ उपकेंद्रांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे.तसेच बोरुडी, भिवधानोरा, मालुंजा, काटेपिंपळगाव, मांजरी आरापूर व दहेगाव मुरमी या ठिकाणी नवीन ३३ केव्हीचे उपकेंद्र मंजूर केले. यामुळे शेतकरी औद्योगिक व घरगुती ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती बंब यांनी दिली.
पुढील पंधरा वर्ष पायाभूत गोष्टींचा विचार करता गंगापूर खुलताबाद मतदार संघातील ११४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीसाठी दाखल केलेला असून त्या कामांना देखील मंजुरी मिळून काम प्रत्यक्षात सुरू होईल असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला.

शेतकऱ्यांसाठी रात्री ऐवजी दिवसा बारा तास सौर उर्जेवर लाईट मिळावी त्यासाठी उपकेंद्रांतर्गत सौर प्रकल्प मिळावे यासाठी जागेची चाचपणी सुरू असून लवकरच तोही प्रकल्प मार्गी लावण्यात येईल.
मागील ४८ वर्षात महावितरणाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत जी कामे अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी करायला हवी होती ती मागील १४ वर्षांपूर्वीची कामे आपण मंजूर करून आणली आहे.

खुलताबाद तालुक्यात १३२ केव्हीचे फक्त एकच उपकेंद्र होते. त्यानंतर कसाबखेडा। निरगुडी येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र मंजूर केले आहे. त्याच बरोबर बाजार सावंगी येथे नवीन १३२ केव्हीचे उपकेंद्र शासन स्तरावर मंजुरीसाठी दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!