संतापजनक घटना.अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणा-या नराधमास अटक

गंगापूर (प्रतिनिधी)अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचाराचा प्रयत्न करणा-या लिंग पिसाट विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ मे रोजी आकरा वर्षीय मुलीचे आई व वडील कार्यक्रमाला बाहेर गेले असल्याचा फायदा घेऊन आरोपी निसार हसन शेख रा. भोयगाव ता. गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने संध्याकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटीच असल्यामुळे घरात घुसून म्हणाला की, मला किस दे असे म्हणून अंगाशी झटायला लागला त्यास विरोध केला असता त्याने मुलीच्या कानाजवळ चापट मारुन बळजबरीने पॅन्ट काढु लागला त्यास विरोध करित असतांना कोणीतरी आल्याचा आवाज आल्याने धमकी दिली की ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला जिवंत मारुन टाकीन व तेथून तो घराच्या मागच्या दरवाजातून पळुन गेला. तेवढ्यात आई वडील आल्याने मुलीने त्यांना सर्व हकिगत सांगितली.तेव्हा सहा वाजेच्या सुमारास आई, वडीलांनी निसार शेख यांच्या घरी जावुन जाब विचारला असता त्याने व त्याचे आई वडील यांनी माफी मागुन आमचा मुलगा तुमच्या मुलीला त्रास देणार नाही. तो तुमच्या घराकडेही येणार नाही असे सांगितल्यावर घरी निघुन आलेअसता रात्री आठ वाजता वडील कंपणीत ड्युटीला गेले होते. आई व मुलीला रात्री नऊ वाजेचे सुमारास निसार हसन शेख याने घरासमोर येवुन तुझे आई वडील घरी का आले होते असे म्हणुन शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व निघुन गेला या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात भादवी कलम ३५४,३२३,५०४,५०६ व पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास प्रभारी सपोनी शाईनाथ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!