गायी कापतो असे म्हणत गंगापूर येथे तुर सोंगणा-या एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

गंगापूर (प्रतिनिधी) तुम्ही गायी कापता असे म्हणत एका टोळक्याने तुर सोंगणा-या शेतकऱ्यांवर व महीलेवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असुन या प्रकरणी सहा जणांसह ईतर आरोपींवर गुन्हा दाखल.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास मुमताज हरुन कुरेशी व त्यांचा भाऊ निसार हे स्वतः च्या मोजुदाबाद शिवारातील शेतामध्ये तुर सोंगत असतांना ११.३० वाजेच्या सुमारास काही लोक लाठ्या काठ्या, कोयता घेवुन त्यांच्या दुचाकीवर बसुन शेता मध्ये अचानक येवुन तुम्ही गायी कापतात असे म्हणुन फिर्यादी व निसार याला मारायला सुरवात केली. फिर्यादी मुमताजच्या हात, पाय, व मानेवर लाकडी दांड्याने मारहाण केली व निसार मन्नान कुरेशी (३१)याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व खांद्यावर कोयत्याने मारहाण केली असता निसार याचे डोके फुटले व तो शेतात पळुन गेला असता आम्हाला मारणारे लोक पण त्याच्या मागे पळाले. काही वेळाने निसार व मुले तसेच भाऊ रेहमान कुरेशी हे शेतामध्ये आले तो पर्यंत मारणारे लोक पळुन गेले होते.या प्रकरणी मुमताज कुरेशी यांच्या फिर्यादीवरून अभी अंकुश लाहुरे रा. गंगापुर, श्रीकांत नावंदर रा. गंगापुर, महेश कृष्णा गायकवाड रा. बोलेगाव ता. गंगापुर, मयुर अशोक गुंजाळ रा. रा. बोलेगाव ता. गंगापुर, विनोद लोने रा. रा. बाळापुर ता. गंगापुर, सुनिल टिके रा. गंगापुर, हे व ईतर लोकांवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!