गंगापूर कोर्टासमोर पैशाची पिशवी हिसकावून पळणा-या अल्पवयीन चोरट्याला नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

गंगापूर कोर्टासमोर पैशाची पिशवी हिसकावून पळणा-या अल्पवयीन चोरट्याला नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

गंगापूर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हातातून दिड लाख रुपये हीसकावून घेऊन पोबारा करणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी पकडून चोप दिला व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील शेतकरी दिलीप मिसाळ यांनी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी लासुरनाक्यावरील व्यकंटेश पतसंस्थेतुन १२ जुलै रोजी दुपारी दिड लाख रुपये काढुन मोटारसायकलवर बसून छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले असता काही क्षणातच चोरट्याने मिसाळ यांच्या हातातून दिड लाख रुपयांची पिशवी हीसकावून पळ काढला असताना त्यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता त्यांने कोर्टाच्या आवाराच्या भिंतीवरुन उडी मारुन आवारात घुसला असता पत्रकार अतुल रासकर व राम गवळी यांनी त्याला पकडले असता कोर्टातील पोलिसांनी त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडवून हाकलून दिले परंतु न्यायालयाच्या बाहेर रोडवर असणा-या नागरिकांनी त्याला पकडून चोप देण्यास सुरुवात केली या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अल्पवयीन चोरट्यास नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असता चोरट्याची पोलीसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ आक्षेपाहार्य सामान आढळून आले त्याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक चौरे हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!