लग्न समारंभाहुन परततांना गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगांव येथील आई व मुलाचा रस्ता दुर्घटनेत करुण अंत. पैठण येथील घटना.


पैठण (प्रतिनिधी) बोलेरो व मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत लिंबे जळगांव येथील आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बोलेरो चालकाच्या विरोधात पैठण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

एका नातेवाईकाच्या लग्न समारंभाहुन परततांना पैठण संभाजीनगर रस्त्यावर महेश ट्रेडर्स जवळ एका भरधाव वेगाने व निष्काळजीपणे धावणाऱ्या बोलेरो जीपच्या जोरदार झालेल्या धडकेत माय लेकराचा करुण अंत झाला, दहा वर्षांपूर्वी पितृछत्र हरवले आणि आज आई सह एकुलता एक मुलगा ही काळाने हिरावून घेतल्याची दुर्दैवी घटना रविवारी ५ मे रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथील विधवा महिलां मुन्नीबाजी राजु शेख वय (४०) व एकुलता एक मुलगा समिर राजूभाई शेख (२१) हे पैठण तालुक्यातील आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाहुन दुचाकी वाहन क्रमांक एम एच २० जी बी ९२८७ वर बसुन घरी लिंबे जळगांवकडे वापस जात असतांना महेश ट्रेडर्स जवळ येताच संभाजीनगर कडून पैठण शहराकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या बोलेरो जीप क्रमांक एम एच १६ ए वाय ८२१२ च्या चालकाने जोरदार धडक दिली या धडकेत समीरचा जागीच मृत्यू झाला तर आई मुन्नीबाजी हिला दवाखान्यात घेऊन जातांना वाटेतच गतप्राण झाली या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटना स्थळी धाव घेऊन अपघातातील मृतांचे शव शासकीय रुग्णालयात हलविले असुन या प्रकरणी सत्तार शेख यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालकाच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवुन दोघांच्या मृत्युस कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालक फरार झाला असुन पोलिस शोध घेत आहे.

घरात मुलगी एकटीच
शेख समीर शेख राजू याचे दोन वर्षांपूर्वी पितृछत्र हरवले होते आई मुन्नीबाजी ही समीरला आपले सर्वस्व समजून गुजारा करत होती पती राजू शेखच्या मृत्यू नंतर एक मुलगी आणि एक मुलगा असा गोड प्रपंच सुरू होता मात्र आज रविवारी काळाने असा घाला घातला की होत्याचे नव्हते झाले आणि आता फक्त एक मुलगी पाठीमागे राहीली आहे..

घटना सुर्यास्त समयी घडल्याने लगेच शवविच्छेदन करता न आल्याने हे दोन्ही मृतदेह शवगृहात ठेवले होते. लिंबे जळगाव येथुन आलेल्या नातेवाईकानी शवगृहासमोर मोठा आक्रोश केला.६ मे रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर लिंबे जळगांव येथे दफन विधी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!