दुर्दैवी घटना.जुने कायगाव येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या

गंगापूर (प्रतिनिधी) जुने कायगाव येथील चोवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातील हुकला वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.४) दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली आहे. दीपक शिवाजी मोहीम (वय २४) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपक यानी रात्री दोन ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान मध्य प्राशन करून राहत्या घरातील हुकाला लाईट वायरच्या साह्याने गळफास घेतला आहे.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार दीपक याने अंतर्गत कलह,तसेच शेजाऱ्यांच्या वादावरून गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ गंगापूर पोलीस स्टेशनचे कायगाव बीट अमलदार श्रीकांत बर्डे,संजय मोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.मयत दीपक यास पुढील उत्तरीय तपासणीसाठी मोरया रुग्णवाहिका द्वारे गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे.दीपक याच्या पश्चात आई-वडील लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेची गंगापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट अंमलदार श्रीकांत बर्डे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!