मुल होण्यासाठी अघोरी कृत्य.जामगांव येथील भोंदू हकीमसह एका महिलेने भुत काढण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या शरीरात खिळे ठोकून गंभीर जखमी केल्याने गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल


गंगापूर (प्रतिनिधी) जादुटोण्याच्या सहाय्याने अंगातील किन्नरची आत्मा काढण्याच्या नावाखाली लाकडी काठीने मारहाण करुन व लोखंडी खिळ्याने शरीराला ईजा करुन अमानुष छळ करणाऱ्या भोंदू हकीम व त्यांच्या आई विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमय्या मझर शेख, वय 35 वर्ष, व्यवसाय घरकाम, रा. पोस्ट ऑफीस, गंगापूर, ता. गंगापूर, जि छत्रपती संभाजीनगर यांनी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझे लग्न 2011 मध्ये झालेले आहे लग्नाला 13 वर्ष झालेले असून बाळ होत नसल्याने मझर अब्दुल करीम शेख यांनी पत्नीला ब-याच वेळा वेगवेगळया दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले तरीही उपचारात फरक पडला नाही, त्यामुळे उपचार करणे बंद केले.
2022 मधील दिवाळी सनाच्या कालावधीत नात्यातील व जामगाव येथे राहण्यास अमलेले हकीम मुक्तार शेख यांची आई आबेदा शेख यांनी आमच्या घरी येऊन पतीला सांगितले की, माझा मुलगा हकीम शेख यास अल्लाहची देणगी असून त्याला माणसांना झालेल्या भूतबाधा, करणी कवटाळ, असहाय्य किंवा जुनाट रोग तसेच काळ्या जादूसंदर्भात बाहेरचे सर्वकाही समजते. तरी तू तुझ्या बायकोला एकदा त्याच्याकडे पाठवून बघ, काहीतरी फरक नक्कीच पडेल असे सांगितल्यावर पतीचा त्यांच्यावर विश्वास बसल्याने 2-3 दिवसांनी जामगाव येथे हकीम मुक्तार शेख यांच्या घरी घेऊन गेले त्यावेळी हकीम शेख यांनी त्यांचे घरातील एका रुममधील फरशीवर मध्यभागी बसविले तेव्हा फिर्यादीचे पती मझर शेख हे देखील तिथेच होते. हकीम शेख यांनी ऊर्दू भाषेत काही मंत्रोच्चार (ईलम) केला व फिर्यादीकडे विचारपूस केली. त्यानंतर हकीम शेख यांने एक मातीची कुंडी ठेवून त्यामध्ये लाकडी काड्या टाकून आग पेटविली व त्याचे शेजारीच एक काळी बाहुली, 2-3 सुया व 5-6 लिंबु तसेच लिंबाच्या झाडाचे डगळे ठेवले व त्यानंतर स्वतःचे डोळे बंद करून ऊर्दू भाषेत काही मंत्र म्हणत थोड्यावेळाने तुझ्या अंगात एक किन्नर (तृतीय पंथी) च्या आत्म्याने प्रवेश केलेला असल्याचे सांगुन जमीनीवरील काळी बाहुली उचलली व त्यावर कुंडीतल्या काड्यांची राख ठाकून मंत्रोच्चार केला व त्या काळया बाहुलीला सुया टोचून सुईच्या टोकाला लिंबु टोचले व लिंबाच्याळ डगळयाने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन म्हणाला की, तुझ्या अंगातील किन्नरची अर्धवट आत्मा ह्या बाहुलीत आलेली आहे, मी त्या आत्मावर माझ्या मंत्रोच्चाराने उपचार करेल असे सांगितले व अंगाला कुंडीतील राख लावुन जाण्यास सांगितल्याने पतीसोबत घरी आल्यावर पतीला अशा जादुटोण्याने मुलबाळ होत नाही असे म्हणाले असता पतीने सांगितले की आपण इतके वर्षे वेगवेगळे दवाखाने केले तरी काही फरक पडला नाही किमान याच्याने तरी काही फरक पडेल असे म्हणाल्यामुळे पतीचे ऐकुन घेतल, मागील दोन वर्षात बऱ्याच वेळा हकीम मुख्तार शेख याचेकडे जावुन प्रत्येक वेळी हकीम शेख हा वेगवेगळ्या प्रकारे मंत्रोच्चार करुन तसेच लिंबु अंगावरुन व सुया टोचलेल्या बाहुलीवरुन ओवाळून टाकुन किन्नरची आत्मा तुझ्या शरीराला सोडण्यास तयार नाही असे सांगून लाथा बुक्क्यांनी मंत्रोच्चार करत मारहाण करीत असे व हकीम शेख यांना त्यांची आई आबेदा शेख ही देखील मदत करीत असे. परंतु हया उपचाराने मुलबाळ होईल या आशेने हकीम शेख याचे जादुटोण्याचा त्रास सहन केला.
१८: एप्रिल रोजी दुपारी अडीच वा. सुमारास फिर्यादी पतीसह हकीम शेख यांचे घरी गेले होते. त्यावेळो हकीम शेख याने घरातील नेहमीच्या रुममध्ये फरशीवर खाली बसण्यास सांगितले व पतीला रुममधील एका कोपऱ्यात बसण्यास सांगितले. हकीम शेख याने फिर्यादी समोर मातीची कुंडी ठेवली व त्यामध्ये लाकडी काड्या टाकून आग पेटवून मंत्रोच्चार सुरु केला. काही वेळाने त्याची आई आबीदा शेख ही देखोल शेजारी डाव्या बाजुला येऊन बसली त्यावेळी तिच्या हातात हीरव्या मिरच्या होत्या. हकीम शेख याचे मंत्रोच्चार करणे संपल्यावर कुंडीच्या शेजारी एक काळी बाहुली, २ ते ३ सूया, ५.६ लिंबु जमीनीवर ठेवले व त्याचे शेजारीच एक लोखंडी जाड मोठा खिळा व लाकडी काठी ठेवली. त्या सर्व वस्तूवर कुंडीतील राख टाकत मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हकीम शेख याने त्याची आई आविदा शेख ही मंत्रोच्चार करत डोळ्याने खुणावल्यानंतर आविदा शेख हीने फिर्यादीच्या डोक्याचे केस दोन्ही हातांनी पकडल्यानंतर हकीम शेख याने जमीनीवर ठेवलेला लोखडी खिळा पाठीवर, उजव्या पायाचे मांडीवर टोचण्यास सुरुवात केली. फिर्यादीला त्रास होत असल्याने मदतीसाठी पतीकडे बघुन आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता हकीम शेख याने पतीला तू जागेवरुन उठलास तर तुझ्या बायकोच्या अंगातील किन्नरची आत्मा तुझ्या अंगात घुसेल असे म्हणाल्याने पती देखील घाबरुन जागेवरच बसून राहिले हा आरडाओरड पाहून आबीदा शेख हीने बळजबरीने नाक दाबुन तोंडात तिच्या हातातील हिरव्या मिरच्या बळजबरीने कोंबल्या व गिळून घे तेव्हाच तुझ्या अंगातील किन्नरची आत्मा बाहेर निघेल असे म्हणू लागली. फिर्यादीने आबिदा शेख हिला प्रतिकार करत असल्याचे पाहुन हकीम शेख याने जमीनीवर ठेवलेल्या लाकडी काठीने माझ्या अंगावर मारुन मला दुखापत केली. सदरचा प्रकार हा बराच वेळ चालला होता. काहीवेळाने हकीम शेख व त्याचे आईने मला मारहाण करणे बंद केल्यावर जमीनीवर ठेवलेल्या, काळया बाहुलीस सुया टोचल्या व बाहुलीला टोचलेल्या सुईच्या टोकावर लिंबु टोचुन हातात दिले व म्हाणाला की तुझ्या अंगातील किन्नर आता तुला त्रास देणार नाही, लवकरच तुम्हाला मुलबाळ होईल असे सांगितले. त्यानंतर तेथून पाच वा. सुमारास घरी निघुन आले. परंतु हकीम शेख व आबीदा शेख यांनी माझ्या केलेल्या मारहाणीच्या कृत्यामुळे फिर्यादीला चालता येत नसल्याने भाऊ नबी शेख व शरीफ शेख रा. कसाबखेडा यांना बोलावुन घेतले तेव्हा माहेरी कसाबखेडा येथे आले माहेरीगेल्यावर माझी आई व भाऊ यांना सोबत झालेला प्रकार सांगितल्याने त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत सांगितल्याने २४ एप्रिल रोजी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये हकीम मुक्तार शेख व त्याची आई आबेदा शेख रा. जामगाव यांनी मला मुलबाळ होत नसल्याचे पाहुन त्याचे राहते घरी जामगांव येथे जादुटोण्याच्या सहाय्याने माझ्या अंगातील किन्नरचो आत्मा काढण्याच्या नावाखाली मला लाकडी काठीने मारहाण करुन व लोखंडी खिळ्याने शरीराला ईजा करुन अमानुष छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!