पोलिस वर्दीतील खाकीला काळीमा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाराच निघाला सहायक पोलिस उपनिरीक्षक..चार दिवस कोठडीचे आदेश. डीएनए चाचणी नंतर कळेल खरा आरोपी?

पोलिस वर्दीतील खाकीला काळीमा.. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाराच निघाला सहायक पोलिस उपनिरीक्षक..चार दिवस कोठडीचे आदेश. डीएनए चाचणी नंतर कळेल खरा आरोपी?
गंगापूर (प्रतिनिधी) सख्ख्या भावा नंतर नात्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर भावानंतर बावन्न वर्षीय नराधमांविरुद्ध १३ आक्टोंबर रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येथील न्यायालयाने १७ आक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून डीएनए चाचणी नंतर कळेल खरा आरोपी?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिस आयुक्त कार्यालयात कार्यरत आरोपी सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष होनाजी गांगुर्डे याने नात्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी घरात कोणी नसताना सहा महिन्यांपूर्वी व नंतर वारंवार बलात्कार केला.
पीडितेने सुरुवातीला फक्त भावाने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे फक्त भावाविरोधात गुन्हा दाखल केला; परंतु या प्रकरणात आणखीन एक गुन्हेगार असून, तो पोलिस खात्यात असल्याने, मुलीला त्याचे नाव सांगण्याची हिंमत झाली नाही.
मात्र, याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी पीडितेला धीर देत अधिक माहिती घेतली असता, तिने नातेवाईक असलेल्या आरोपी .सहायक पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डेनेही वेळोवेळी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला.
तसेच पीडितेच्या सख्ख्या भावानेही पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत शेतात व राहत असलेल्या घरी वेळोवेळी अत्याचार केला.
यामुळे पीडिता दोन महिन्याची गर्भवती राहिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा
प्रारंभी भावावर, नंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष होनाजी गांगुर्डे रा. छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात पॉक्सो व विविध कलमांतर्गत १३ आक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्भवती राहिल्याने घटना समोर

” अत्याचारानंतर अल्पवयीन पीडिता दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याने तिचे सारखे पोट दुखत होते. त्यामुळे कुटुंबियांनी तपासणी केली असता, हा प्रकार समोर आला.

आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने सुरुवातीला फक्त भावाचेच नाव सांगितले. मात्र, पोलिसांच्या अधिक तपासात पोलिस खात्यातनातेवाईक असलेल्या आरोपींचे नावही समोर आले.
*पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या*
पोनि सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानेश्वर साखळे व पोउपनि अझहर शेख यांनी मालेगाव येथे नातेवाइकाकडे लपून बसलेल्या आरोपी भावाला व पोलिस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डे यांना ताब्यात घेतले. गांगुर्डे याला येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १७ आक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून वरील दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!