शिरेसायगाव येथे दिवसाढवळ्या चोरट्यांचा महिलेवर चाकुहल्ला, ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चोरट्याना पकडून चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिरेसायगाव येथील गावात राहणाऱ्या एका महिलेवर भिक्षा मागणाऱ्या भामट्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेच्या दीड महिन्याच्या बाळाच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाव्या मागितल्या असता महिलेने ओरडाओरड चालू केला त्यामुळे चोरट्यांनी घरातील चाकू घेऊन महिलेच्या पोटात खुपसला.

महिलेच्या शेजारील एका कुटूंबात विवाह असल्याने बहुतेक गावकरी लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे मदतीसाठी लवकर कोणी आले नाही मात्र महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी गावातून धूम ठोकली गावात ही वार्ता मोबाईलद्वारे वाऱ्यासारखी पसरताच गावातील युवकांनी मोबाईल द्वारे एकमेकांना संपर्क साधून घटनेची माहिती पंचक्रोशीतील गावात दिली त्यामुळे गावात उपस्थित असलेल्या काही युवकांनी त्या चोरट्यांचा शोध घेतला असता चोरटे खडक वाघलगाव रस्त्याने गेले असल्याची माहिती मिळाली त्यामुळे वाघलगाव शिरेसायगाव,गोपाळवाडी, वडाळी येथील गावकऱ्यांनी तब्बल दीड किलोमीटर सिनेस्टईल पाठलाग करून चोरट्यांना पकडले व निबार चोप दिला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही भामट्यांना ग्रामस्थांनी ताब्यात दिले सदर घटना दिवसाढवळ्या अकरा वाजता, घडली मात्र या घटनेने पंचक्रोशीतील गावकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हा दाखल करण्यास आलेल्या महीलेला शिल्लेगांव पोलिसांनी चार तास ताटकळत ठेवले असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला अद्याप माहिती मिळाली नाही.या प्रकरणी शिल्लेगांव पोलिस कोणता गुन्हा दाखल करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.दिवसाढवळ्या अशा घटनांमुळे पोलीसांचा गुन्हेगारांनवर वचक नसल्यामुळे चोरी दरोड्याच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!