आहो आश्चर्यम.दुस-या लग्नासाठी चक्क बायकोने जीवंत दिव्यांग नव-याचे मृत्यूपत्र बनवून कागदोपत्री मारुन टाकले.गंगापुर तालुक्यातील पत्नीचा प्रताप चव्हाट्यावर 


गंगापूर (प्रतिनिधी)
पती जिवंत असतांना चक्क पत्नीने पतीला अपघातात मयत झाल्याचे दाखवत ग्रामपंचायतीकडुन मृत्यू प्रमाणपत्र काढणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आदींची चौकशी करून संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची दिव्यांग पती कारभारी कुकलारेने यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तसेच गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव येथील रहिवासी कारभारी रामदास कुकलारे हे मागील एक वर्षापासून कौटूंबिक वादामुळे पत्नी कोमल कुकलारे सोबत राहत नसुन पत्नी माहेरी राहते. त्यामुळे पत्नीच्या माहेरकडील लोकांनी आज पर्यंत पती कारभारी यास विविध मार्गाने त्रास दिल्याने कारभारी यांनी विविध विभागाकडे तक्रारी दाखल केल्या तसेच गंगापूर येथील न्यायालयात देखील १५६ (३) प्रमाणे दाद मागितली सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून कारभारी यांची पत्नी व सासरकडील लोक हे
मुलांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याने त्यांना समज देण्यात येवुनही कारभारी यांच्या सासरकडील मंडळी ऐकत नसल्याने
बाल कल्याण समीती कडे तक्रार दाखल केली असता या समीतीचे पथक तक्रारदार कारभारी यांच्या घरी जाऊन चौकशी केली या चौकशी मध्ये
कारभारी यांच्या आईने पत्नी कोमल यांचे कपाट ऊचकले असता यामध्ये पत्नीने पोळ रांजणगाव ग्रामपंचायतीचे बनविलेले पती जिवंत असतांना मृत्यू प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे आढळल्याने पतीला मानसीक धक्का बसला त्यावेळी पती कारभारी यांना कळाले पत्नीने एका प्रियकरासोबत रजिस्टर विवाह करण्यासाठी हे सर्व कागदपत्रे बनवून लग्न करणार असल्याचे कळाले. पती कारभारी कुकलारे यांच्या लक्षात आल्याने पतीने दिलेल्या तक्रार अर्जात सर्व माहिती नमूद केली आहे विषेश म्हणजे कारभारी कुकलारे हे दिव्यांग असून पत्नीने इतरांच्या मदतीने पती जिवंत असतांना खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनविले सदरचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन न्याय देण्याची मागणी कारभारी कुकलारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर कारभारी रामदास कुकलारे यांची स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!