गंगापूर(मयुर बन्सोड)मुख्यमंत्री समृध्दी चषक जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतगंगापूरच्या धूत कन्या विद्यालयाच्या पूजा मोहितेला दुसरे पारितोषिकपंधरा हजार रोख व स्मृतीचिन्ह देउन गौरव…
महाराष्ट्र शासनाच्या राज्य रस्ते विकास महामंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री समृध्दी चषक निबंध स्पर्धेत गंगापूर येथील राजाबाई धूत कन्या कनिष्ट महाविद्यालयाच्या ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु. पूजा ध्रुव मोहिते हिने उपविजेतेपद पटकावले आहे.
ही स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यातील शाळा व कनिष्ट महाविद्यालयांमध्ये दि. ८ व ९ जानेवारी २३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कु. पूजा ध्रुव मोहिते हिने ‘रस्त्यांचा विकास आणी प्रगती’ या विषयावर निबंध लिहून हे उपविजेतेपद पटकावले आहे.
तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता आर.टी. खलसे व शिक्षणाधिकारी माध्यमिक मधुकर देशसमुख यांच्या सहीने पूजाला पंधरा हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देउन तिचा गौरव करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक मा.खा. राजकुमारजी धूत, अक्षयकुमारजी धूत, शालेय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार मंत्री, तृप्ती मंत्री, प्राचार्या संजीवनी बेंद्रे यांनी अभिनंदन केले आहे.
संबंधित पोस्ट
कवडीमोल दरामुळे रस्त्यावर कांदे फेकून रास्तारोको आंदोलन..शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद…
कवडीमोल दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद…अर्धा तास गंगापुर वैजापूर महामार्ग बंदगंगापूर(प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा एक रूपया किलो…
भडके यांच्यावरील गुन्हा वापस न घेतल्यास विद्युत वितरण कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार -रविंद्र चव्हाण
भडके यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा विद्युत वितरण कंपनीच्या गंगापूर येथील उपविभागीय कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा सरपंच रवींद्र चव्हाण यांनी…
गंगापूर येथे इलेक्ट्रॉनिक व मोबाईल शाॅपीला आग अंदाजे पंधरा ते वीस लाखाचे नुकसान
गंगापुर (प्रतिनिधी) चिंतामणी इलेक्ट्रॉनिक व मोबाईल शाॅपीला अचानक आग लागून मोबाईलसह फ्रिज टीव्ही जळून खाक झाल्याने अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात…